दहावीतही मुलीच अव्वल; जळगाव जिल्ह्याचा 87 टक्के निकाल

0

जळगाव। राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल मोठ्या प्रतीक्षेनंतर 13 जून मंगळवार रोजी ऑनलाईन जाहीर झाला आहे. राज्यात एकूण 88.74 टक्के निकाल लागला असून यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. 91.46 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 86.51 आहे. बारावीप्रमाणे दहावी परीक्षेतही मुलीच अव्वल ठरल्या आहे. यंदाच्या निकालात 0.82 टक्क्यांनी घट झाली असताना 48 हजार 470 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहे. तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा 18 जुलैपासून होणार असल्याची माहिती नाशिक बोर्डाकडून दिली आहे. जळगाव जिल्ह्यात देखील निकालात मुलीच अव्वल ठरल्या आहेत. निकाल बघण्यासाठी सायबर महाविद्यालय, शाळेत विध्यार्थ्यानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या गुणवंताचे पालकाकडून पेढे वाटप करीत कौतुक करण्यात आले. ठिकठिकाणी फटाके फोडून आंदौत्सव साजरा करण्यात आला आहे

तारखेमुळे गोंधळ
सोशल मीडियावर दहावीच्या निकालाबाबत वेगवेगळ्या तारखा व्हायरल होत होत्या. मोठ्या प्रतीक्षेनंतर आज (13 जून) राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दहावी परीक्षेचा निकाल साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर झाल होता. गेल्यावर्षी (2016) 6 जून रोजी, 2015 मध्ये 8 जूनला निकाल जाहीर झाला होता. मात्र, यंदा निकाल जाहीर होण्यास विलंब झाला. त्यात मोठी भर पडली सोशलमीडियाची रोज नव्याने जाहीर होणार्‍या निकालाच्या तारखांनी पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. आज अखेर दहावीचा निकाल जाहीर झाला.

परीक्षेदरम्यान जिल्ह्यातून एकूण 52 गैरप्रकार उघडकीस 50 विध्यार्थी अपात्र
जळगाव जिल्ह्यातून 23 हजार 157 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत पहिल्या श्रेणीत यशस्वी झाले. असून 14 हजार 187 विद्यार्थी दुसर्‍या श्रेणीत तर 1 हजार 749 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले. गेल्या सालच्या बरोबरीत प्रथम श्रेणीत यशस्वी होणार्‍या विध्यार्थ्याच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे. जिल्ह्यातून परीक्षेत गैरप्रकार करणार्‍यांसाठी शासनाच्या वतीने विशेष पथक तयार करण्यात आले होते. परीक्षेदरम्यान जिल्ह्यातून एकूण 52 गैरप्रकार उघडकीस आले. त्यापैकी 50 विध्यार्थ्यांवर अपात्रतेची कार्यवाही शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.

नंदिनीबाई विद्यालयाचा 95.94 टक्के निकाल
नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 95.94 टक्के लागला आहे. यात वैभवी रामदास कचरे ही विद्यार्थीनी 97.40 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली आहे. तर धनश्री ललीत चौधरी ही 97 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकवला आहे. किर्ती पांडुरंग सोनवणे (96.20 टक्के), रूचिता गोपाळ पाटील (95.60 टक्के), लिना चंद्रकांत अत्तरदे (93.00 टक्के), लोचन सुभाष भंगाळ (92.40 टक्के), गायत्री चंदन जावळे (92.20 टक्के), नेहल दिपक चोपडे (91.60 टक्के), वैष्णवी दिनकर चौधरी (91.60 टक्के), युक्ता विजय पाटील (91.00 टक्के), गौरव यशवंत पाटील (90.40 टक्के), प्रियंका सुधाकर माळी (90.40 टक्के), जान्हवी अनिल काळे (90.00 टक्के), पायल रविंद्र भंसाली(84.60 टक्के) गुण मिळविले आहेत. शाळेतील 87 विद्यार्थींनींना 80 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून यश संपदान केले आहे. यशस्वीतांचे प्राचार्य श्रीमती सी. एस. पाटील, उपमुख्याध्यापक आर. आर. पाटील, पर्यवेक्षक एन. व्ही. महाजन, सौ. एम. एम. धांडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

भगिरथ इंग्लिश स्कूलचा 98.55 टक्के निकाल
भगीरथ इंग्लिश स्कूलचा निकाल 98.55 लागला आहे. शाळेतील 277 पैंकी 273 विद्यार्थीं पास झाले आहेत. 90 टक्केच्यावर 9 विद्यार्थीं पास झाले आहेत. राहुल सहादू वाघ व सोपान दत्तात्रय मोरे दोघ 95.80 टक्के मिळवून संयुक्तरित्या विद्यालयात प्रथम आले आहेत. भावेश विजय गुरव हा 95.60 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे तर कल्पेश संतोष वाघ यांनी तृतीय क्रमांक पटकविला आहे. रेणुका प्रवीण महाजन (94 टक्के), निलेश नीलकंठ पाटील (93.80 टक्के), सौरभ नाना मोरे (93 टक्के), योगेश सतीश पाटील (91.80 टक्के), विशाल विजय घुल (91.80 टक्के), श्‍वेता संजय भालेराव (81.20 टक्के गुण मिळविले आहेत. विशेष प्राविण्यांसह 95 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत 125, द्वितीय श्रेणीत 51 तर पास क्लासमधून 2 विद्यार्थीं उत्तीर्ण झाले आहेत.

काशिबाई उखाजीचा 81.34 टक्के निकाल
काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयानचा निकाल 81.34 टक्के लागला आहे. विद्यालयातून रोहीत विनोद बारी याने 93.60 टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकविला आहे. तर लोकेश नरेंद्र खडके याने 92.40 टक्के मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. ओजल मनोज चौधरी हीने 91.60 टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळविला तर मागासवर्गींय विद्यार्थ्यांमधून सौरभ गोपाळराव तायडे याने 84.60 टक्के मिळवून यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष विजय कोल्हे, चिटणीस अवधूत पाटील, उपचिटणीस सतिश खडके. मुख्यध्यापिका सौ. जे. आर. गोसावी, उपमुख्यध्यापक ए. व्ही ठोसर, पर्यवेक्षिका वी. डी. अत्तरदे, पर्यवेक्षक एच. जी. काळे, सौ. वी. एस. राणे, सौ. पी. ए. पाटील, पी. जे. पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी अभिनंद केले आहे.

इकरा शाहीन हायस्कूलचा 93.95 टक्के निकाल
इकरा शिक्षण संस्था संचलित इकरा शाहीन उर्दू हायस्कूल मेहरूणचा निकाल 93.95 टक्के लागला आहे. शाळेतून 149 विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती. यापैकी 140 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 23 विद्यार्थ्यांनी 80 टक्केपेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. अरशिया नियाजोद्दीन मलिक 90.80 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकविला आहे. तर तस्कीन ईस्माईल शेख 88.60 टक्के गुणमिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. उज्मा उमर रंगरेज(87.80 टक्के), सै. अदनान अहमद शकील (87.40 टक्के), खान कामरान गुलाब नबी (86.40 टक्के) गुण प्राप्त केले आहेत. शाळेच्या 24 विद्यार्थी डिस्टिकंशन मिळविले आहे तर फस्ट क्लास 63, सेकंड क्लास 49 तर पास क्लास 4 विद्यार्थ्यांनी प्राप्त केला आहे. यशस्वीतांचे संस्थेचे अध्यक्ष अ. करीम सालार, सचिव अलहाज अ. गफ्फार मलिक, चेअरमन डॉ. मो. ताहेर शेख, प्राचार्य शेख गुलाब इस्हाक व संस्थांचा पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

जिल्ह्यातून 54 हजार 267 विद्यार्थी पास
उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक परीक्षेत्रातील धुळे जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 89.79 टक्के लागला आहे. जळगाव जिल्ह्याचा 87.78 असून नंदुरबारचा 86.38 निकाल लागला आहे. दहावीच्या परीक्षेत उत्तर महाराष्ट्रातून दोन लाख 2 हजार 478 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी एक लाख 77 हजार 603 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक जिल्ह्याचा 87.42 टक्के निकाल लागला आहे. जळगाव जिल्ह्यातील 61 हजार 825 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 54 हजार 267 विद्यार्थी पास झाले. धुळे जिल्ह्यातील 28 हजार 732 विद्याथ्र्यापैकी 25 हजार 799 विद्यार्थी पास झाले. तर नंदुरबार जिल्ह्यातील 20 हजार 742 पैकी 17 हजार 917 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तर महाराष्ट्रातून 88 हजार 126 विद्यार्थीनींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 79 हजार 922 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. यावर्षी मुलांच्या तुलनेत मुलींनी आघाडी घेत बाजी मारली आहे.

सायबर कॅफेवर वाद
शहरातील एम जे कॉलेज परिसरातील सागर सायबर या दुकानावर एका युवकाने निकाल पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. निकाल पाहण्याची आतुरता असल्याने पूर्ण पणे झुंबड उडाली होती. आगोदर माझा निकाल द्या म्हणून एका विध्यार्थ्याने सायबर चालकाशी वाद घातला, होणार्‍या घटनेचा उपस्थितांकडून विरोध करण्यात आला.यावेळी पोलिसांना फोन करून तक्रार केल्याचे सांगितल्या नंतर युवक पसार झाला होता.

ए.टी.झांबरे महाविद्यालयात जागृती पाटील, स्नेहा झांबरे संयुक्तरित्या प्रथम
दहावीची परिक्षा मार्च महिन्यात घेण्यात आली होती. या परिक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवार 13 जून रोजी जाहीर करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील 61 हजार 825 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 54 हजार 267 विद्यार्थी पास झाले. यात ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाचा निकाल 97.75 टक्के निकाल लागला आहे. तर स्नेहा संजय झांबरे आणि जागृती नितीन पाटील यांनी 99 टक्के गुण प्राप्त करीत विद्यालयात संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकविला आहे. झांबरे विद्यालयातील 132 विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीत आले असून प्रथम श्रेणीत 72, द्वितीय श्रेणीत 33 उत्तीर्ण झाले आहेत. केसीई सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, शालेय समन्वयक के. जी. फडके, मुख्याध्यापक दिलीपकुमार विश्‍वनाथ चौधरी, पर्यवेक्षक उषा नेमाडे, प्रतिता झांबरे, महेंद्र नेमाडे, आर. आर. पाटील, पुनम कोल्हे, नरेंद्र पालवे, ए.एन. पाटील, डिंगबर पाटील, पराग राणे, धिरज चौधरी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

आकाश माळी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण
भाऊसाहेब यू. एन. रायसोनी स्कूलचा विद्यार्थी आकाश संजय माळी हा 95.40 टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाला आहे. त्याने मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल आकाशच्या घरी येऊन शाळेतर्फे त्याचा गौरव करण्यात आला. जैन इरिगशन शिट् स्टोअर विभागातील सहकारी संजय माळी यांचा तो मुलगा आहे. जैन इरिगशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी देखील माळीचे अभिनंदन केले.

रावसाहेब रुपचंद विद्यालयात दिलीप सराफ 98.40 टक्के गुण मिळवून प्रथम; यशस्वीतांवर अभिनंदनाचा वर्षाव
रावसाहेब रूपचंद विद्यालयात ऋषिकेश दिलीप सराफ हा 98.40 टक्के मिळवून प्रथम आला आहे. तर रामनारायण राजेंद्रप्रसाद महेश्वरी व फाल्गुनी प्रसाद जोशी यांनी 97.60 टक्के गुण प्राप्त करून संयुक्तपणे द्वितीय क्रमांक पटकविला आहे. तर अमेय नंदकिशोर पाटील, नितीन आयुश कलंत्री (97.20 टक्के), प्रीतम दत्तात्रय निकुंभ (96 टक्के), लोकेश धनराज भंगाळे , ऋषिकेश रविंद्र शेटे , खिलेश संजीव काडके (94.60टक्के), राजेश्वरी चंद्रशेखर येवले (94.20टक्के), प्रसाद समाधान नगरधान, निलेश राजेंद्र जोशी (93.80टक्के), दुर्गेश प्रभाकर भोळे , हेमंत गोपाल भारूळे (93.60टक्के), किर्तेश प्रकाश पाटील , सौरभ नितीन राणा (93.40टक्के), भावेश सुहास बर्‍हाटे (93.20टक्के), प्रतिक्षा राजू महाजन(93टक्के), यशोदन रामचंद्र पाटील, रोहन विलास सोनवणे (92.80टक्के), दुर्गेश मुकेश पाटील (92.60टक्के), ऋद्रेश संतोष सराफ (92.40टक्के), लोकेश रामकृष्ण बोरोले , वैष्णवी चंद्रशेखर कापडे , भावेश राजेंद्र माळी , उमाकांत दिलीप सोनवणे (92.20टक्के), शामभूजी हेमंत राजेभोसले , प्रथमेश रवींद्र खैरनार , अवंतिका विजय बागुल (92 टक्के), कुणाल दिलीप कोल्हे , मंदार जयंत वाणी (91.80टक्के), निकीता केशवराव पाटील , तेजस हेमंतराव साळुंखे (91.60टक्के), मोहित कैलास सपकाळे , वैभव देविदास नकावे , तन्मय रामकृष्ण पाटील (91.40टक्के), यश शांताराम बडगुजर, आर्श्‍वया एकनाथ वैद्य , निरंजन केशव घोळके (91.20टक्के), हर्षल जितेंद्र रूले (91 टक्के), निकीता दिलीप जैन , लिना अरूण सपकाळे , शुभम सचिन शर्मा , रेवती सुरेश मोरे , कुणाल हिरालाल चौधरी , कुणाल प्रकाश पाटील (90.60टक्के), दिव्या दिनेश पाटील , नवीन राजेंद्र चिरमाडे (90.40टक्के), संस्कृती प्रदिप पाटील, साक्षी जितेंद्र सेतवाल, कोमल पंडीत वानखेडे, सुप्रिया जयंत पाटील, सुनील सुरज श्रीखंडे, प्रांजल दिपक वाणी (90.20टक्के), नव्यानवेली दिनेश लोखंडे, भाग्यश्री वसंत काळकर, स्वप्नजा कुंदन चौधरी (90 टक्के) गुण प्राप्त केले आहेत.

ला.ना.शाळेचा 97.42 टक्के निकाल
शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयाचा 97.42 टक्के निकाल लागला आहे. शालांत परिक्षेत 427 विद्यार्थ्यांपैकी विशेष प्राविण्य 134, प्रथम श्रेणी 177, द्वितीय श्रेणी 96 तर 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतून 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणारे 20 विद्यार्थी आहेत. यात संकेत (96.80 टक्के) गुण मिळवून प्रथम आला आहे. अथर्व नितीन सावदेकर याने 96.40 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. महेश प्रताप कन्हेरे (95.40 टक्के), भूषण एकनाथ पाटील, तेजस निलेश सोनार (95 टक्के), अजय नरेंद्र वाघ (94.60 टक्के), रोहित कुंदन सोनवणे, रोहित अनिल बडगुजर (94.40 टक्के), केयर सुनित चौधरी, नितीन प्रदीप पाटील (94.20 टक्के), चेतन समाधान पाटील (93.60 टक्के), प्रेमसागर मनोज पवार (93.40 टक्के), रोहित शंकर मराठे (92.40 टक्के), मोहित मनोज पाटील, मनिष ईश्‍वर अहिरे (92.20 टक्के), निर्मलकुमार भरत सोनवणे (92 टक्के), कुणाल नारायण सोनवणे (91.60 टक्के), आशिष नंदकिशोर चोपडे, संकेत दत्तुसिंग पाटील(91 टक्के), कृष्णा उत्तम शेलार (90.80 टक्के) यांनी यश संपादन केले आहे. या गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या माता पित्यांचा सत्कार संस्थेचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. सुशिल अत्रे, सचिव अभिजीत देशपांडे, विश्‍वस्त प्रेमचंद ओसवाल, सुरेंद्र लुंकड, कार्यकारणी सदस्य पारसमल कांकरीया, दिलीप मुथा, शरदच्चंद्र छापेकर, मिरा गाडगीळ, विजयालक्ष्मी परांजपे, मुख्याध्यापक दुर्गादास मोरे, उपमुख्याधापिका वैशाली चौधरी, रमेश सुरळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

मुलीच ठरल्या सरस
मुलींनी आपल्या यशाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. जिल्ह्यातील 90.71 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 85.68 टक्के मुले दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातून 25 हजार 760 मुलीनी परीक्षा दिली. त्यापैकी 23 हजार 366 मुली उत्तीर्ण झाल्या. तर 36 हजार 65 मुले परीक्षेला बसले होते, त्यापैकी 30 हजार 901 मुले ही परीक्षा उत्तीर्ण झाले. तसेच गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या एकूण निकालात 2 टक्क्यांनी घट झाली असून, गेल्या वर्षी जिल्ह्याचा एकूण निकाल 89.78 टक्के इतका लागला होता.

मूल्यशिक्षणात विद्यार्थ्यांना अपयश पचविण्याबाबत मार्गदर्शन गरजेचे
दहावीचा निकाल ऑनलाईन लागल्याने विद्यार्थ्यांनी सायबर कॅफे, मोबाईल अ‍ॅप द्वारे आपापले निकाल पाहण्यास एकच गर्दी केली होती. यातच काही विद्यार्थी नापास झाल्याने त्यांच्या निराशा दिसून आली. या निराशेतूनच जळगाव तालुक्यातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने मित्रांच्या आनंदावर विरजण पडले आहे. इंग्रजी व गणित या दोन विषयात नापास झाल्याने चेतन रमेश पाटील (वय 16) या दहावीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता नांद्रा, ता.जळगाव येथे घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. परीक्षा अपयश येणे व हे अपयश पचविणे याबाबत पालकांनी विद्यार्थ्यांनाच मार्गदर्शन करायला हवे. मात्र तसे होतांना दिसत नाही. यातूनच नांद्रा येथील विद्यार्थ्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. शाळेत मूल्यशिक्षण देतांना विद्यार्थ्यांना अपयश पचविण्याबाबत मार्गदर्शन केल्यास असा प्रकार पुन्हा घडणार नाही, असे बोलले जात आहे.