दहावीत यशस्वी झालेल्यांचचे विविध स्तरांतून स्वागत

0

जळगाव। महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी 13 रोजी ऑनलाईन जारी करण्यात आला. मागील वर्षापेक्षा टक्केवारी वाढली असून मागील वर्षापेक्षा या वर्षी देखील मुलींनीच बाजी मारली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांवर संस्थाध्यक्ष, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांसह सर्व स्तरातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नातवाईक व आत्पेष्टांकडून यशस्वीतांचा कौतुक होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश सेमी इंग्रजी माध्यमांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. टक्केवारी वाढीसाठी शाळांकडून प्रयत्न करण्यात आले.

फुले विद्यालयाचा 89.44 तर लेलेचा निकाल 73 टक्के
पहुर । जामनेर तालुक्यातील पहुर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा 10 वीचा निकाल 89.44 टक्के लागला आहे. पहुर केंद्रात फुले विद्यालय दुसर्‍या क्रमांकावर आहे. विद्यालयातन निकीता प्रविण पार (87.40) टक्के गुण मिळवुन प्रथम आली असून अश्‍विनी गणेश काकडे या विद्यार्थीनीने (80.40) टक्के गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकविला आहे. ऋतीक वैजीनाथ पटवर्धन या विद्यार्थ्यांने (78.20) टक्के मिळवले असून तो विद्यालयात तृतीय आला आहे. तसेच आर.टी.लेले विद्यालयाचा निकाल 73.00, मिल्लत उर्दु हायस्कुलचा निकाल 88.88 तर आर.बी.आर. कन्याविद्यालयाचा निकाल 65.62 टक्के लागला आहे. गुणवंताचा संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे, मुख्याध्यापिका वैशाली घोंगडे, शंकर भामेरे, हरिभाऊ राऊत, बी.एन.जाधव, कल्पना बनकर, पल्लवी वानखेडे आदींनी कौतुक करत अभिनंदन केले आहे.

अनुश्री गुजराथीचा सत्कार
चोपडा । येथील चोपडे शिक्षण मंडळ संचलित प्रताप विद्या मंदिराची विद्यार्थीनी अनुश्री नितीन गुजराथी हीने नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात 98.80 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. प्रताप विद्या मंदिराची यावर्षी शताब्दी साजरी होत असतानां शाळेच्या यशाचा गौरव करण्यात येत आहे. संस्थाध्यक्ष जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते अनुश्रीचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दलूभाऊ जैन, राजा मयूर, चंद्रहास गुजराथी, आशिष गुजराथी, प्रसन्न गुजराथी, भुपेंद्र गुजराथी, प्रा.आशिष गुजराथी आदी उपस्थित होते. अनुश्रीचे वडील नितीन गुजराथी व आई रुपाली गुजराथी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

गरुड विद्यालयाचा निकाल 90.29 टक्के
शेंदुर्णी । येथील आ.र.भा.गरुड विद्यालयाचा 10 वीचा निकाल 90.29 टक्के लागला आहे. तर सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्यालयातुन एकुण 340 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी 307 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विद्यालयातुन मानसी दत्तात्रय पाटील या विद्यार्थींनीने 96.40 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक, संयमी अनिल जैन 96.20 टक्के मिळवत द्वितीय, स्नेहल विलास पाटील हीने 95.80 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकविला आहे. गौरव पाटील याने 94.20 तर अपुर्वा पोतरे हीने 93.40 टक्के गुण मिळविले आहे. विद्यालयातील 90 टक्के पेक्षा जासत गुण मिळविणारे एकुण 13 विद्यार्थी आहेत तर 80 टक्कांपेक्षा अधिक गुण मिळविणारे एकुण 28 विद्यार्थी आहेत.

शेंदुर्णीचे आर. एल. विद्यालय जामनेर तालुक्यात प्रथम
शेंदुर्णी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील स्व.शेठ राजमल लखीचंद ललवाणी माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 98.80 टक्के लागला असून मराठी माध्यमांच्या शाळांत विद्यालयाने जामनेर तालुक्यातुन प्रथम क्रमांक मिळविला आहे. बारावी परीक्षेतही विद्यालय तालुक्यात प्रथम होते. विद्यालयातुन मुख्याध्यापक प्रमोद खलसे यांची कन्या प्राची खलसे हीने 92 टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकविला आहे. नेहा बापू मनोरे 91 टक्के मिळवत दुसरा तर कांचन अमृत लहासे याने 84.80 टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक पटविला आहे. यशस्वीतांचा संस्थाध्यक्ष ईश्‍वर बाबूजी जैन, मनिष जैन, अतुल साबडा, मुख्याध्यापक प्रमोद खलसे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची अभिनंदन केले आहे.

वरखेडी बडोले विद्यालयाचा निकाल 85.27 टक्के
वरखेडी । येथील श्रीमती पी.डी बडोला माध्यमिक विद्यालयाचा 10 वीचा निकाल 85.27टक्के लागला असून सेमिचा वर्गचा निकाल शंभर टक्के लगला आहे. श्रुती विनोद सोनार हिला 90 टक्के असून ती विद्यालयात पहिली आली आहे. निकिता नामदेव पाटील हीला 87.40 टक्के मिळाले असून ती दुसरी तर शुभम रविंद्र चौधरी 86.80 तिसरा आला आहे.

श्रीकृष्ण विद्यालय सेमी माध्यमाचा निकाल 100 टक्के
शेंदुर्णी। येथील डॉ.हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा सेमी इंग्रजी माध्यमाचा दहावी निकाल शंभर टक्के लागला आहे. पराग बारी योन 93.20 टक्के मिळवत प्रथम, ऐश्‍वर्या राजपूत 92.60 द्वितीय, साक्षी कुलकर्णी 92.00 तृतीय क्रमांक पटकविला आहे. संस्थाध्यक्षा कौमुदी साने, कांतीलाल ललवाणी, राजेंद्र पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी कौतुक केले आहे.

शांतीदेवी चव्हाण पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे यश
चाळीसगाव । नुकतेच उन्हाळी परीक्षा 2017 चे निकाल जाहीर झाले. त्यात चाळीसगाव येथील शांतिदेवी चव्हाण पॉलिटेक्नीकच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या घवघवीत यश संपादन केले. महेश पांडुरंग महाजन या विद्यार्थ्याने गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले आहे. महेश हा सिव्हील इंजिनिअरींगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. कंम्पुटर इंजिनिअरींग शाखेच्या तीसर्‍या वर्षातील निकिता मालपुरे हीने 81.63 टक्के गुण मिळवत प्रथम तर दुसर्‍या वर्षात आरती प्रकाश पवार 85.6 प्रथम, प्रथम वर्षात कामिनी भून वाबळे 82.63 प्रथम, सिव्हील इंजिनिअरींग शाखा तीसर्‍या वर्षात जयश्री पाटील 86 टक्के प्रथम, दुसर्‍या वर्षात श्वेता सोनवणे 75 प्रथम, प्रथम वर्षात महेश महाजन – 78 प्रथम, मेकॅनिकल इंजिनिअरींग शाखेच्या तीसर्‍या वर्षात केतु राजेंद्र पाटील 84 टक्के प्रथम, दुसर्‍या वर्षात विलास कदम 76 प्रथम, प्रथम वर्षात गोकुळ बाळासाहेब पाटील 79 प्रथम, टेलीकम्युनिकेशन शाखेच्या तीसर्‍या वर्षात नितिन मराठे 80.35 टक्के प्रथम दुसर्‍या वर्षात स्वाती माळी 67.50 प्रथम, प्रथम वर्षात शुभांगी विजय मोरे 83.86 प्रथम उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.