दहावीत यश मिळविण्यार्‍या विद्यार्थ्यांचे कौतूक

0

जळगाव । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी / मार्च 2017मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल 13 जून रोजी दुपारी 1 वाजता जाहीर झाला गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या तारखांविषयीची खोटी माहिती फिरत होती, अखेर राज्य मंडळाकडून निकालाच्या तारखेची अधिकृत निकाल जाहीर करण्यात आल्याने या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. पाचोरा तालुक्यातील बुर्‍हाणी इंग्लिश मेडियम स्कुलची चालशिला ज्ञानेश्‍वर उबाळे हिला 97.80 टक्के गुण मिळवून ती तालुक्यात प्रथम, एरंडोल तालुक्याचा काबरे विध्यालयाचा मयूर शंकर वारे विध्यार्थ्याने 97.00 टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम येण्याची बाजी मारली.

पाचोरा तालुक्यातून चारुशिला दुबाळे (97.80 टक्के) प्रथम
पाचोरा । पाचोरा तालुक्यातील बुर्‍हाणी इंग्लिश मेडियम स्कुलची चालशिला ज्ञानेश्‍वर उबाळे हिला 97.80 टक्के गुण मिळवून ती तालुक्यात प्रथम, गो.से. हायस्कुलचा अजय भास्कर पाटील हा (97.40 टक्के) दुसरा तर शिंदे माध्यमिक विद्यालयाची प्रतिक्षा रणजित पाटील हिला (96.80 टक्के) गुण मिळवून तालुक्यात तिसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. पाचोरा येथील शिंदे माध्यमिक विद्यालयात 134 विद्यार्थी परिक्षेत बसलेले असतांना 134 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या शाळेचा निकाल 100 टक्के लागला यात प्रथम प्रतिक्षा रणजित पाटील (96.80), द्वितीय- अपर्णा प्रदीप गिते (96), तृत्तीय- रश्मी शरद पाटील (94.20), चतुर्थ- निलेश संजय पाटील व शाम गोपाल पाटील (93.80). पाचवा- भावेश संजय कुमावत (93.60) येथील गो.से. हायस्कुलमध्ये 493 विद्यार्थी परिक्षेस बसलेले असतांना 442 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल 89.65 टक्के लागला. यात प्रथम – अजय भास्कर पाटील (97.40), द्वितीय सौरव कैलास निंकुभ (96.60), तृत्तीय अनिल तुषार पाटील (95.80), चतुर्थ मानसी सुनिल भिवसने व सायली विकास सोनवणे (93.80).

बुर्‍हाणी इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये 71 विद्यार्थीपैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या शाळेचा निकाल 100 टक्के लागला. यात प्रथम चारूशिला ज्ञानेश्‍वर उबाळे (97.80), द्वितीय जान्हवी शांताराम पाटील (94.80), तृतीय अमिषा मिलिंद येवले (94.20) गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. शहरातील कोंडवाडा गल्लीतील कन्या माध्यमिक विद्यालात 115 विद्यार्थी परिक्षेत बसले होते. त्यापैकी 104 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या शाळेचा निकाल 90.43 टक्के लागला. यात प्रथम-प्राजक्ता वासुदेव चव्हाण (79 टक्के), द्वितीय – प्रियंका कैलास पाटे (78.02) तृतीय निकीता अमृत पाटील व हर्षदा संजय पाटे (78.02) तर नवजीवन माध्यमिक विद्यालयाचा निकाल 85.71 टक्के लागला असून यात प्रथम निकीता लक्ष्मण पाटील (85 टक्के), द्वितीय-वैभव रामदास पाटील (82), तृतीय अविनाश शामकांत सुर्यवंशी (74 टक्के) याप्रमाणे निकाल लागल्याने या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. येथील जय किरण प्रभागी न्यु इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये 32 पैकी 32 विद्यार्थी उत्तीर्ण होवून शाळेचा निकाल 100 टक्के लागला. यात प्रथम कोमल किशोर पाटील (93.60), द्वितीय – खुशी विशाल संघवी (92), तृतीय – आशिष महेशकुमार रिसाणी (89.40) गुण मिळवून उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जीवन जैन व दिनेश बोथरा सह शिक्षकांनी अभिनंदन केले.

तोंडापूर येथील जैन विद्यालयाची नम्रता अग्रवाल अव्वल
जामनेर । तोंडापुर ता जामनेर येथील रत्नाबाई सुरेश जैन माध्यमिक विद्यालयचा दहावीचा निकाल 91.86 टक्के लागला असून 86 पैकी 79 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून नम्रता किशोर अग्रवाल हिने 95 टक्के गुण मिळवून प्रथम तर संकेत आत्माराम पाटिल याचा 90टक्के गुण मिळवून द्वितीय तर सुवर्णा गजानन वाणी हिचा 86टक्केगुण मिळवून तृतीय क्रमांकने उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व् त्यांना मार्गदर्शन करणार्‍या गुरुजनांचे संस्थेचे चेयरमन संजय गरुड, स्थानिक सल्लागार समिति अध्यक्ष दिंगबर पाटिल, सचिव दिपकराव गरुड वसतिगृह सचिव अशोक देशमुख मुख्याध्यापक पी.व्ही.पाटिल व गावकारी यांनी अभिनंदन केले.

संत गजानन विद्यालयात पुनम सोनवणे तर लिटील हार्टमध्ये प्रेरणा पाटील प्रथम
शहरातील अमर संस्था संचलित लिटील हार्ट इंग्लीश मेडीयम स्कूल प्रेरणा भाऊसाहेब पाटील 86 टक्के गुण मिळवून पहिली तर दुसरी सिध्दी प्रकाश महाजन 85 टक्के गुण मिळाले तिसरा क्रमांकाने हेमांगी सुर्यवंशी 84 टक्के गुण मिळाले आहेत. तर शहरातील अमर संस्था संचलित संत गजानन विद्यालय वेले यात पुनम सोनवणे 89.40 टक्के गुण मिळवून पहिली तर दुसरी रेवती चौधरी 88.60 टक्के गुण मिळाले तिसरा क्रमांकाने योगेश सोनवणे 85 टक्के मिळाले आहेत. संत गजानन माध्य. विदयालय वेले चा एकूण 100 टक्के निकाल लागला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गुलाबराव पाटील, मनोज चित्रकथी, दीपक जोशी, मुख्याध्यापक गोपाल पाटील तसेच सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन केले आहे.

प्रताप विद्या मंदिराची यशाची परंपरा
चोपडे एज्युकेशन सोसायटी संचलित, प्रताप विद्या मंदिर आपले शताब्दी वर्ष साजरे करीत असताना एस.एस.सी.च्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेत यश मिळवून शाळेची उज्ज्वल यशाची परंपरा राखली. कॉपी मुक्त अभियान व सर्वसामान्य गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देणे ही धोरण स्वीकारत प्रताप विद्या मंदिराने आपली यशस्वी परंपरा राखली आहे. शाळेचा निकाल 89.18 टक्के लागला असून सेमी माध्यमाचा निकाल 100 टक्के लागला आहे. उर्दू माध्यमाचा निकाल 82 टक्के लागला आहे. 133 विद्यार्थी विशेष प्राविण्यसह व 144 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेत. यात 89.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात व तालुक्यात अनुश्री नितीन गुजराथी या विद्यार्थिनीने प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. उर्दू माध्यमाची विद्यार्थिनी मारिया सदफ मो. इम्रान अन्सारी 90 टक्के गूण मिळवून प्रथम आली. यातून 32 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गूण मिळवून विशेष प्रविण्यासह भव्य यश संपादन केले. या सर्व उज्ज्वल यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष व्ही.सी. गुजराथी, चेअरमन राजाभाई मयूर, सचिव माधुरी मयूर , संचालक चंद्रहास गुजराथी, छो हि. लाड , उर्मिला गुजराथी, मुख्याध्यापक अरुणा पाटील, उपप्राचार्य. डी.एस.पांडव, उपमुख्याध्यापक आर.बी. देशमुख पर्यवेक्षक डी.व्ही.याज्ञीक, डी.के. महाजन, ए.टी. पाटील, गोविंद गुजराथी, उल्हास गुजराथी आदिंनी अभिनंदन केले आहे.

चोपड्यात दहावीत मुली आघाडीवर पंकज विद्यालयाचा 97.64 टक्के निकाल
पंकज विद्यालयाचा निकाल 97.64 टक्के लागला असून निकालाची परंपरा यावर्षीही कायम राहिली. 25 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे 25 विद्यार्थी आहेत तर विशेष प्राविण्य मिळवून 95 विद्यार्थी यशस्वी झाले. 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी याप्रमाणे प्रथम-भावेश सुनिल पाटील(97.40 टक्के) व गितेश काशिनाथ बडगुजर(97.40 टक्के), द्वितीय गोकर्ण अनिल पाटील (96.80 टक्के), तृतीत गणेश रविंद्र पाटील (96.20 टक्के) चतुर्थ- पियुष शैलेंद्र पाटील (95.60 टक्के) व प्रणव प्रकाश माळी (95.60 टक्के), श्रेयस मनोज चौधरी (94.80 टक्के), दिपेश सुनिल पाटील (94 टक्के), प्रांजली मोहन पाटील (93.80 टक्के), जीवनदीप मंगल पाटील (93.60 टक्के ), प्रशांत किशोर पाटील(93.40) टक्के, नयन अनिल चौधरी (93 टक्के), यश जितेंद्र भावसार (92.20 टक्के), तेजस रोहिदास सोनवणे (92टक्के), पियुष हुकूम बाविस्कर (91.80 टक्के), हरीश रामचंद्र पाटील (91.80टक्के), भावेश धनराज चौधरी (91.60 टक्के), शुभम योगेश सिसोदे (91टक्के), केतन प्रल्हाद पाटील (91 टक्के), वाल्मिक विकास पाटील (90.80टक्के), हर्षल संजय सपकाळे (90.80 टक्के), शुभम शामकांत पाटील (90.60 टक्के), धीरज मंगल पाटील (90.40 टक्के) , योगिता विश्वनाथ यादनिक (90 टक्के), सृष्टी दिनेश पाटील (90 टक्के)संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षात 25 विद्यार्थ्यांनी 90टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थाध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले, संचालक नारायणदादा बोरोले, संचालक भागवत भारंबे, सचिव अशोकदादा कोल्हे आदींनी अभिनंदन केले.

महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात मोक्षिका सुलताने प्रथम
चोपडा । येथील भगिनी मंडळ संचालित महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचा दहावी परीक्षेचा एकूण निकाल 87.60 टक्के लागला असून विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मोक्षिका ईश्वर सुलताने (87.40 टक्के) या विद्यार्थिनीने पटकावला आहे. तर व्दितीय बारी कोमल संजय (87 टक्के), तृतिय धनगर गायत्री दिलीप (83.80 टक्के) यांनी मिळवले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा पूनम गुजराथी, सचिव उर्मिलाबेन गुजराथी, उपाध्यक्षा छाया गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, मुख्याध्यापक सुनील चौधरी, प्रा. आशिष गुजराथी यांच्यासह शिक्षक वृन्दाने अभिनंदन केले.

फबालमोहन विद्यालयाचा 100 टक्के निकाल
शहरातील अमर संस्था संचलित बालमोहन विद्यालयातील पारस प्रदीप बिश्व़ास 90 टक्के गुण मिळवून पहिला तर दुसरा ओम विनोद सोनार (88टक्के) तिसरा क्रमांकाने भुषण नथ्थु धनगर 88.40 टक्के मिळाले आहेत. विदयालयातुन एकुण 51 विदयाथी प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहेत. बालमोहन विदयालय चा एकूण 100 टक्के निकाल लागला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गुलाबराव पाटील, मनोज चित्रकथी, दीपक जोशी, मुख्याध्यापिका रेखा पाटील, प्रदीप पाटील तसेच सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन केले आहे.

पाचोरा कन्या विद्यालयाचा निकाल 90.43 टक्के
पाचोरा । येथील माध्यमिक व उच्च माध्यमीक कन्या विद्यालयाने आपल्या यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली असून मार्च 2017 मध्ये झालेल्या डडउ परीक्षेत शाळेचा निकाल 90.43टक्के लागला आहे. यंदा या शाळेतून 115 विद्यार्थिनी परीक्षेस प्रविष्ट झाल्या होत्या त्यापैकी 104 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. शाळेतून प्रथम क्रमांक प्राजक्ता वासुदेव चव्हाण (80टक्के), द्वितीय क्रमांक प्रियंका कैलास पाटील (78.4टक्के), तृतीय क्रमांक निकिता अमृत पाटील (78.2 टक्के) व हर्षदा संजय पाटील (78.2 टक्के) गुण मिळविले आहे.

अमळनेर तालुक्याचा निकाल 91.34 टक्के
अमळनेर । अमळनेर तालुक्याचा एकूण निकाल 91.34 टक्के एवढा लागला असून शाळा निहाय निकाल प्रताप हायस्कुल 91.2टक्के, गंगाराम सखाराम हायस्कुल 98.22टक्के, डी.आर. कन्या हायस्कुल 94.40टक्के, नगरपालिका माध्यमिक विद्यालय 66.66 टक्के, के.डी. गायकवाड माध्यमिक विद्यालय 94.01टक्के लागला. यात भोई भूषण 90.20 टक्के मिळवून प्रथम, द्वितीय पाटील निकिता 89.20 टक्के, तृतीय देसले वैष्णवी 89.20 टक्के आणि भोई गायत्री 88.20 टक्के गुण मिळविले आहे.

शहरातील लोकमान्य विद्यालयाचा निकाल 97.02 टक्के लागला असून प्रथम पियुष काशिनाथ चौधरी 94.00 टक्के, द्वितीय साक्षी कैलास बडगुजर 94.00 टक्के तर तृतीय श्रद्धा शिवाजी चौधरी 93.40 टक्के तसेच सावित्रीबाई फुले कन्या माध्यमिक विद्यालयाचा निकाल 95.83टक्के टक्के लागला आहे. साने गुरुजी कन्या हायस्कुल 96.42टक्के लागला असून प्रथम सुष्ठी साळी 99 40 टक्के, द्वितीय मुक्ताई मोरे 96.40 टक्के, तृतीय दीप्ती पवार 96.20 टक्के आले. साने गुरुजी नूतन हायस्कुल 97.44 टक्के लागला यात प्रथम शुभम निकम 99.60 टक्के, द्वितीय राज शहा 96.40 टक्के, तृतीय कौस्तुभ पाटील 95.80 टक्के प्रमाणे आले आहे. जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय 90.14 टक्के, शिवाजी हायस्कुल तांबेपुरा 84.61 टक्के, अल फाईझ उर्दू गर्ल्स हायस्कुल 95.45 टक्के, नॅशनल उर्दू हायस्कुल 90.41 टक्के, शेठ पी. डब्लू. अग्रवाल इंग्लिश मेडियम स्कुल 97.82 टक्के असा लागला असून 4401 विद्यार्थ्यांपैकी 4020 विद्यार्थी पास झाले आहेत

भडगाव येथे लाडकूबाई विद्यालयाचे यश
भडगाव । येथिल किसान शिक्षण संस्थामधील भडगाव 92, गिरड 87.64, कोळगाव 91.05, आमडदे 76.53, वडजी 82.66, महिंदळे 85.23, शिंदी 88.67 पळासखेडे 92.67, भातखंडे 81.63, अंजनविहीरे 100, अंतुर्ली 96.77 असे टक्केवारी असुन शहरातील लाडकूबाई विद्यालयातील प्रथम उमेश दत्तात्रय गढरी (95.60) द्वितीय उत्कर्षा वैभव सुर्वे (93.40) तृतीय निकीता किशोर शंखपाळ (93) चतुर्थ राकेश प्रविण पाटील (92.60) तर कै.कु.पवार विद्यालयाचा 91.66 टक्के निकाल लागला असुन विद्यालयात वैष्णवी सुरेश कापुरे 90.80 टक्के मिळवत प्रथम आली. तर अनिकेत पितांबर सुर्यवंशी 84.60 टक्के, व्दितीय विशाल निळकंठ विसपुते 83.80 टक्के गुण मिळवत तृतीय आला आहे. आणि पाटील विद्यालयाचा 94.69 निकाल गुणवंत विद्यार्थी प्रथम सौरभ सुरेश चव्हाण 93, व्दितीय उदय दिलीप भंडारी 92.90, तृतीय मनदीप संजीव बेनाडे 91.20, चतुर्थ नितिन अथर्व सोनजे 90.40, पाचवा अमेय ओंकार ठाकरे 90.20 यांनी या टक्केवारी प्रमाणे गुण मिळविले आहे.

एरंडोल तालुक्यातून मयूर वारे प्रथम
एरंडोल । एरंडोल तालुक्याचा बोर्डाच्या परीक्षेचा 86.28 टक्के निकाल लागला असून.रा.ति.काबरे विध्यालयाचा मयूर शंकर वारे विध्यार्थ्याने 97.00 टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम येण्याची बाजी मारली तर रा.ति.काबरे विद्यालयाचा यश सुनील तोतला याने 94.80 टक्के गुण मिळवून दुसरा येण्याची बाजी मारली तर याच विद्यालयाची प्रतीक्षा अरविंद वाणी हिने तालुक्यातून तिसरी येण्याचा मन मिळविला. तालुक्यातून 2 हजार 19 विद्यार्थ्यानी परीक्षा दिली होती तर 1740 विद्यार्थ्यांनी उत्तिर्ण झाले आहे. जिजामाता माध्यमिक विद्यालयाचा निकाल 91 टक्के एवढा लागला असून विद्यालायातून मुलींनी प्रथम येण्याचा मान मिळविला. यात गायेत्री सुनील चौधरी 86.80 टक्के गुण मिळवून प्रथम व युगंधरा भगवान शिरसाठ 86.60 टक्के गुण मिळवून दुसरी तर 85.00 टक्के मिळवून तिसरा क्रमांक अकांक्षा नंदलाल भावसार हिने यश मिळविले. तसेच ग्रामीण उन्नती माध्यमिक विध्यालयाचा निकाल 80 टक्के लागला या विद्यालायातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली यात किशोर रवींद्र पाटील 83.60 टक्के गुण मिळवून प्रथम वैद्य वैशाली सुखदेव हि दुसरी तर कामिनी इंदल पाटील 73.80 टक्के मिळवून विद्यालायातून तिसरी अली

नगरदेवळा येथील पवार हायस्कूलचा निकाल
नगरदेवळा । शाळेतील 313 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत प्रविष्ट झालेले होते त्यातून 291 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व शाळेचा शेकडा 92.97 टक्के येवढा निकाल लागला. यात आयुष सतीष महाजन 96.00टक्के (प्रथम), पूजा मधुकर शिरुडे 95.00टक्के (द्वितीय), सागर रमेश महाजन 93.80टक्के (तृतीय) प्रमाणे निकाल लागला. या सर्वांचे ग्रामशिक्षण समितीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, मानद चिटणीस, सर्व संचालक तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन तसेच कौतुक केले.

बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयाची परंपरा कायम
धरणगाव । येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाहा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2017 चा निकाल 100टक्के लागला असून शाळेतून चेतन राजेंद्र पाटील 90टक्के प्रथम, कु. ज्योत्स्ना ज्ञानेश्‍वर माळी 96.4टक्के द्वितीय, कु. अदिती जयंत कुलकर्णी 96टक्के तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेत तसेच एकूण 56 विद्यार्थ्यांना 90टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.टी.डी.कुडे, उपाध्यक्ष अंकुश पाटील, सचिव प्रा. रमेश नथ्थु महाजन, सर्व संचालक मंडळ तसेच माध्यमिक विद्यालयाचे मुख्या. एस.एस.पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील व प्रभारी मुख्या. के. वाय. चौधरी यांनी अभिनंदन केले.

सावखेडा कर्णबधीर विद्यालयाचा निकाल 100 टक्के
जळगाव । तालुक्यातील सावखेडा येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचालित श्रवण विकास मंदीर, ह्या कर्णबधीर मुलांच्या विद्यालयातील एकूण 16 दिव्यांग विद्यार्थी एस.एस.सी.परीक्षेला यंदा प्रविष्ठ झाले होते. ह्या कर्णबधीर दिव्यांगांमधे रिद्धी रितेश शाह हिने 85:02 टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम, गायत्री मधुकर चौधरी 83 टक्के द्वितीय क्रमांक मिळविला आहे. सदर यशाकरीता यशस्वितांना मुख्याध्यापक पद्माकर इंगळे सर व शिक्षक गुरूजन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शोभाताई पाटील, सचिव धनंजय जकातदार,शालेय समिती प्रमुख पूनमताई मानुधणे व संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, मुख्याध्यापक पदमाकर इंगळे, वाहन विभाग प्रमुख मिलींद पुराणिक, शिक्षक गुरूजन यांनी अभिनंदन केले.