बेळगाव : दहावीच्या परीक्षेत ६२५ पैकी ६२४ मार्क अर्थात ९९.९९ टक्के गुण मिळाले. मात्र एवढी मेहनत करुनही माझा एक मार्क कुठे गेला, याचा शोध घेण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्याने पेपर रिचेकिंगला पाठवला. रिचेकिंगमध्ये उरलेला एक मार्कही मिळाल्यानंतर हा विद्यार्थी टॉपर ठरला.
बेळगावमधील मोहम्मद कैफ मुल्लाला दहावीत ६२५ पैकी ६२४ मार्क मिळाले. संयुक्तपणे एका विद्यार्थ्यासोबत तो टॉपर होता. मात्र हा एक गुण कसा गेला, याचा शोध घेण्यासाठी त्याने पेपर रिचेकिंगला पाठवला. अखेर रिचेकिंगमध्ये त्याला गमावलेला एक मार्क मिळाला आणि तो बोर्डात टॉपर म्हणून घोषित करण्यात आला. मोहम्मद कैफने विज्ञान वगळता सर्व विषयांमध्ये शंभर टक्के मार्क मिळवले. बोर्डातील तेरा लाख विद्यार्थ्यांपैकी त्याने शंभर टक्के मार्क घेत पहिला क्रमांक पटकावला.