दहावी परीक्षा : ताप्ती पब्लिक स्कुलचा शंभर टक्के निकाल

भुसावळ : सालाबादाप्रमाणे यंदादेखील भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलचा दहावी (सीबीएसई पॅटर्न) परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. कोरोनामुळे शाळा बंद असल्यातरी शिक्षक व विद्यार्थी यांनी ऑनलाईन शिक्षण घेत हे यश गाठले. पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सेक्रेटरी विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष शिरीषकुमार नाहाटा, ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिंसिपल नीना कटलर, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यालयातून प्रथम- भाग्यश्री नारायण निळे (97.6) तर द्वितीय- उस्मान हनीफ पटेल (95.4) आला. अन्य उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये प्रतीक सारंग भारंबे (94.6), श्वेता सतीश शिंदे (94.4), वैष्णवी दीपक पाटील (94.0), प्रियंका आनंदराव ठाकरे (93.8), मसूदर रहमान लसकर 93.6, अवधूत अमोल मुळे (93.4), ऋषी सचिन भंसाली (92.4), अनुष्का अभय फलटणकर (92.2), साहिल शिवाजी गीते (91.6), उबेर मनोर शेख (91.4), यश संजय छाबडीया (90.8), तारू विक्षीतादेवी मानसा (90.8), वांशिता विनोदकुमार छाबडीया (90.6), वैष्णव निवृत्ती भारंबे (90.4), भाग्येश अनंता चौधरी (90.2), चिन्मय जितेंद्र पाटील (90.2) यांचा समावेश आहे.