दहावी पास विद्यार्थ्यांसाठी रोजगार संधी कार्यक्रम

0

निजामपूर। साक्री तालुक्यातील जैताणे येथील ग्रामपंचायत कार्यालयात दहावी पास विद्यार्थ्यांसाठी दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेंतर्गत तीन महिना कालावधीच्या प्रशिक्षणासंदर्भात जनजागृतीसाठी रोजगार संधी हा कार्यक्रम घेण्यात आला. दहावी पास युवकांसाठी रोजगाराची संधी कार्यक्रम झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैताण्याचे सरपंच संजय खैरनार होते. युवकांना योजनेची सविस्तर माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक प्रकल्प अधिकारी आर. एम. कुकावलकर, साक्री पंचायत समिती विस्तार अधिकारी भीमराव गरुड, गटसमन्वय संदीप बोरसे, नायक्स ट्युटोरिअल्स प्रा. लि.नाशिक प्रशिक्षण संस्थेचे विशाल देसले यांनी दिली. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेंतर्गत तीन महिना कालावधीचा प्रशिक्षण कोर्स मोफत सुरु केला आहे. या संधीचा युवकांनी लाभ घ्यावा. प्रशिक्षणार्थी युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी शासनातर्फे वेगवेगळ्या रोजगाराची उपलब्धता करण्यात येणार आहे, असे कुकावलकर यांनी सांगितले. यावेळी विस्तार अधिकारी भीमराव गरुड, सरपंच संजय खैरनार यांनी मार्गदर्शन केले.