आकुर्डी : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ श्री म्हाळसाकांत विद्यालयात दहावी पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण वर्गाला प्रारंभ झाला. प्राचार्य अन्सार शेख यांच्या हस्ते याचे उदघाटन कऱण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक डी. वाय. साळुंखे, पर्यवेक्षक आर. के. ठाकुर, तज्ञ मार्गदर्शक सिंधु मोरे, माया कोथळीकर, ज्योत्स्ना गुरव आदी उपस्थित होते. हिंदी विषयाने प्रशिक्षण वर्गास प्रारंभ झाला,. विषयाचे महत्व, पाठ्यपुस्तक परिचय, व्याकरण, गाभा घटक, जीवन कौशल्य आदी विषयावर तज्ञ मार्गदर्शकांनी प्रशिक्षणार्थिंना मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य अन्सार शेख म्हणाले, नवीन पिढी घडविण्यासाठी शिक्षकांचे योगदान मोलाचे असते.