मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज शुक्रवारी ३० रोजी जाहीर झाला आहे. जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी फेरपरीक्षेत २२.८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. २ लाख २१ हजार ६२९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५०, ६६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १८ हजार १६१ एवढी आहे. १७ जुलै ते ३० जुलै २०१९ या कालावधीत ही परीक्षा झाली होती. फेरपरीक्षेचा निकाल आल्यानंतर विद्यार्थांना पुनर्मुल्यांकन करता येईल. तसेच विद्यार्थांना पुढील शैक्षणिक प्रवेशही घेता येईल.
मार्चमधील परीक्षेत उत्तीर्ण होऊ न शकलेल्या किंवा श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मंडळाने शुक्रवारी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.