दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांचे करीअर प्रबोधन

0

जळगाव। येथील दर्जी फाऊंडेशनतर्फे एमपीएससी, यूपीएससी परीक्षांमध्ये टॉपर्स ठरलेल्या यशस्वितांच्या चर्चासत्र व अनुभव कथनाचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. सद्या सुटीच्या कालावधी असला तरी जागृत पालक व विद्यार्थीच्या उज्जवल भवितव्यासाठी कोणती करीअर निवडावे यासाठी मार्गदर्शन होणार आहे. पालकांची ही समस्या दूर व्हावी व त्यांच्या पाल्याला करीअरची योग्य दिशा मिळावी यासाठी युपीएससी व एमपीएससी परीक्षांमध्ये अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण ठरलेल्या यशस्वीतांना या मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आलेले आहे. मार्गदर्शनाचा कार्यक्रम निःशुल्क असून आज 23 एप्रिल 2017 रोजी सकाळी 9.30 वाजता जळगाव शहरातील ‘कांताई’ सभागृहात घेण्यात येणार आहे. युपीएससी परीक्षेसह एमपीएससीच्या राज्यसेवा, पीएसआय, एसटीआय, एएसओ व यासारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांनाही हा कार्यक्रम खुप मोलाचा ठरणार आहे.

चर्चासत्राला उपस्थितीचे आवाहन
शैक्षणिक गुणवत्तेत आपला मुलगा नेहमी अग्रेसर रहावा या दृष्टीने पालक आपल्या मुलाला शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतू सध्या शिक्षणाची अनेक द्वारे खुली असली तरीही शाश्‍वत व कायमस्वरुपी रोजगार मिळेल अशा क्षेत्राच्या निवडीसाठी पालक व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत गरजेचे असते. योग्य माहिती मिळाल्यास या विद्यार्थ्यांना चांगला व प्रशासकिय रोजगार मिळू शकतो. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये आपण कोणत्या प्रकारे शिक्षण घेतले, मेहनत कशी घेतली, संदर्भ ग्रंथांची निवड, मार्गदर्शकांची निवड आपल्या यशाच्या मार्गवर कोणती भुमिका निभवतात याबाबतीत संपूर्ण व विस्तृत मार्गदर्शनासाठी या चर्चासत्र व अनुभव कथनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रशासकीय क्षेत्रात आपण कसे यशस्वी झालोत यासोबतच चर्चासत्रात पालक व विद्यार्थ्यांच्या शंकाचेही निरसण करणार आहेत तरी करीअरच्या बाबतीत जागृत असणार्या पालकांसह विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गोपाल दर्जी यांनी केले आहे.