नवापूर । तालुक्यातील धुडीपाडा येथे आदिवासी सामाजिक सेवा ट्रस्ट धुडीपाडा या ट्रस्टच्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी या ट्रस्टचे अध्यक्ष राहूल गावीत, उपाध्यक्ष लाजरस गावीत, कोषाध्यक्ष अनिल गावीत, अश्विन वसावे, अजित गावीत, डॉ. गुतीलाल गावीत, शिरीष गावीत, शिमोन रावसाहेब, सुरेश गावीत, पाऊल गावीत, योगेश गावीत, माकता गावीत, मेहेंद्र गावीत यानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.एकुण 30 विद्यार्थी दहावी बारावी उत्तीर्ण झालेले आहे.त्यापैकी तीन विद्यार्थीना 500रू. रोख व जनरल नॉलेज पुस्तक दोन वह्या व पेन बक्षीस देण्यात आले बाकी सर्व विद्यार्थीना जनरल नॉलेज पुस्तक माजी जि.प.अध्यक्ष भरत गावीत, सरपंच उमेश गावीत, डॉ.विनू वसावे, माजी सरपंच प्रकाश गावीत, गणेश गावीत, चव्हाण सर, अरविंद गावीत याच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला होता.