दहावी-बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

0

पुणे । फेब्रुवारी-मार्च 2018मध्ये घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य मंडळाने जाहीर केले. त्यानुसार, बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2018 या कालावधीत तर दहावीची परीक्षा 1 मार्च ते 24 मार्च 2018 या कालावधीत होणार आहे.

सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार असून हे संभाव्य वेळापत्रक आहे. परीक्षेपूर्वी शाळा वा कनिष्ठ महाविद्यालयांकडे येणार्‍या अंतिम वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खातरजमा करून घ्यावी, तसेच व्हॉट्स अ‍ॅप किंवा तत्सम कोणत्याही मार्गाने आलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे.प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे. या वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे 15 दिवसांच्या आत लेखी स्वरूपात पाठविण्याचे आवाहनही मंडळाकडून करण्यात आले आहे.