दहावी, बारावी सीबीएसई परीक्षा ४ में पासून

0

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षणमंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाची दहावी, बारावीची परीक्षा ४ में २०२१ पासून घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाला यांनी दिली आहे. ४ में ते १० जून दरम्यान परीक्षा होणार आहे तर १५ जुलैला निकाल जाहीर होणार आहे. कोरोनामुळे सध्या शाळा, महाविद्यालये उशिरा सुरु झाल्या आहेत. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये याची काळजी घेण्यात आली असून उशिरा परीक्षा घेण्यात येणार आहे.