दहा किलोमीटर सायकल रॅली काढून काँग्रेसतर्फे मोदी सरकारचा निषेध

जळगाव – वाढती महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार शनिवारी जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे काँग्रेस भवनापासून १० किलोमीटरची सायकल रॅली काढुन मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, माजी खा. डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, शहराध्यक्ष शाम तायडे, योगेंद्रसिंह पाटील, डी.जी. पाटील, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, अमजद पठाण, प्रदीप सोनवणे, जाकीर बागवान, जगदीश गाढे, अ‍ॅड. अविनाश भालेराव, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.