दहा रुपयांची नाणी ठरताहेत डोकेदुखी

0

मुक्ताईनगर । नोटबंदीनंतर बँकेकडुन होणार्‍या चलन उपलब्धतेत दहा रुपयांचे नाणे मोठ्या प्रमाणात ग्राहकांना दिले जातात त्यामुळे बाजार पेठेतील चलनात दहा रुपयांची नाणी मोठ्या संखेने दिसु लागली आहेत. परंतु नोटांपेक्षा नाणे जड व संभाळण्यास अवघड असल्याने ग्राहक, दुकानदार, बसवाहक असे सर्वजण दहा रुपयाचे नाणे स्विकारण्यास उत्सुक नसल्याचे दिसत आहे. एकेकाळी व्यवहारात सुट्या पैशांची चणचण भासु नये म्हणुन चिल्लरसाठी गोरगरीबांकडे हात पसरवणारे व कमिशन देऊन सुट्टी नाणी चिल्लर घेणार्‍या लहान-मोठ्या व्यापार्‍यांना आता दहा रुपयांची नाणी नकोशी वाटु लागली आहे.

वाद विवादाचे प्रकार वाढले
भाजी मंडी, चहाचे हॉटेल, ज्युसबार किराणा दुकान मोबाईल रिचार्जचे दुकान बहुतांशी दुकानदार हे दुकानामध्ये दहाचे नाणे दररोज मोठ्या प्रमाणात येत असल्याने नाणी नाही स्वीकारले तर उधारीचा बोजा रोजचे संबध असल्याने ग्राहक तुटण्याच्या शक्यता अन्यथा का स्विकारले नाही म्हणुन कायद्याची झंजट अंगलट येण्याची भिती वाटत असल्याने ग्राहकांसह छोट्या मोठ्या व्यापार्‍यांसाठी दहा रुपयांचा ठोकळा डोके दुखी ठरु पाहत असल्याची चर्चा नागरीकांमध्ये आहे. पुर्वी चिल्लर मिळावी त्यासाठी व्यापारी बॅकेकडे वशीला लावुन किंवा कमिशन द्यावे लागायचे काहीजण देवस्थानकडे मागणी करायचे. आता मात्र याउलट परिस्थिती असून आता दहा रुपयांची नाणी देऊनही कुणी स्विकारत नसल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.