दहा रूपयांची नाणे स्वीकारली जात नसल्याची तक्रार

0

शहादा । शहरात दहा रुपयाचे नाणे स्वीकारले जात नसल्याची तक्रार असुन तहसीलदारांनी या प्रकरणी लक्ष घालून स्टेटबँकेच्या अधिकार्‍यांनी खुलासा करावा, अशी मागणी शहरातील नागरीक व ग्राहकांकडून होत आहे. दहा रुपयाची नाणी चलनातून बाद झालेले नाही तशी रिझर्व बँकेची सूचना अथवा आदेश नसतांना शहरात विविध दुकानांमध्ये छोटे व्यवसाय करणारे भाजीपाला विक्रेते 10 रुपयांची नाणी स्वीकारत नाही. म्हणून नागरीकांमध्ये रोष आहे. विशेषतः शहराच्या नवीन वसाहतीत हा प्रकार जास्त आहे. त्या त्या भागातील दुकानदार 10 रुपयाची नाणी स्वीकारत नाही. वास्तविक दहा रुपयाची नाणी चलनात बाद झाली नसतांना ते न स्वीकारणे हा कायद्याने गुन्हा आहे. यात महिला वर्गानी आपआपल्याजवळ अशी दहा रुपयांची नाणीमोठ्या संख्येने गोळा केली आहेत. संबंधित महिला ह्या हाथगाडी वाल्याकडे किराणा दुकानदाराकडे 10 रुपयांची नाणी देतात पण ते स्वीकारत नाही म्हणून महिला वर्गामध्ये नाराजीच्या सुर आहे. या बाबतीत तहसील दारानी चौकशी करुन 10 रूपयाच्या नाणीबाबत स्टेटबँकेच्या शाखाधिकार्याना जाहीर खुलासा करायला लावणे गरजेचे आहे. अन्यथा एवढया मोठ्या प्रमाणात शहरासह ग्रामीण भागात असलेल्या 10 रुपयांच्या नाण्याचे काय करावे? हा प्रश्न आहे. शहरासह ग्रामीण भागात 10 रुपयांची नाणी बंद झाल्याची अफवा आहे.