जळगाव । एमआयडीसी पोलिसांनी भाडेतत्त्वार कार घेवून ती जळगाव-जामनेर रस्त्यावर जातांना चालकास कोणत्याही बहाण्याने उतरवून वाहन पळवून घेवून चोरी करणार्या चोरट्यास पुण्याहून गुन्ह्यात वर्ग करत अटक केली होती. अटकेनंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्यान त्याची दोन साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली. हेच नव्हे तर या दोघांना त्याने त्याने दहा लाखांची कार अवघ्या दोन अडीच लाखांत विक्री केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.
चालकाला उतरवून कार घेवून करायचा पोबारा
मुंबई-पुणे येथून जळगाव, जामनेरपर्यंत भाडेतत्त्वावर इन्होवा, अर्टीका यासारख्या महागड्या कार नोंदणी करून प्रवास करायचा. ऐन पहाटे अंधारात निर्जन रस्त्यावर लघवीचे नाटक करून खाली उतरायचे किंवा मोबाईल खाली पडल्याचे सांगत चालकास उतरवून कार घेऊन पोबारा करायचा, अशा पद्धतीने जळगाव जिल्ह्यातून पाच महागड्या कार चोरून नेल्याच्या घटना पाच महिन्यांत घडल्या. पिंप्री- चिंचवड (ता. पुणे) पोलिसांनी कारचोरीच्या गुन्ह्यात सय्यद शकील सय्यद युसूफ (वय 37) यास अटक केली होती.
औद्योगीक वसाहत पोलिसांनी आपल्या गुन्ह्यात वर्ग करून शकीलला जळगावात आणले. त्याने जळगावातून पाच कार लांबविल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार तपासाधिकारी एन.बी.सुर्यवंशी यांनी शकील याला दोन दिवस विचारपुस चौकशी केल्यावर त्याने चोरीच्या कार मिळेल त्या किंमतीत विक्री करीत असल्याचे सांगीतले. जळगाव शहरात आल्यावर शकील याने देवांग सतिषभाई रावल (मुंबई) यांच्या मालकीची इन्व्होवा कार (जीजे 90- बीडी 1817) 29 डिसेंबर 2016 ला चालकाला उतरवुन चोरुन नेली होती. ही कार त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री केल्याचे त्याने तपासात सांगीतल्यावरुन कोठडी संपल्यावर आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात होते.
दोेन्ही पुणे येथे अटकेत
शकिल सय्यद युसूफ याने चोरुन नेलेली देवांग रावल यांच्या मालकीची कार अवघ्या दोन लाखांत विक्री केली आहे. कार घेणार्या सैय्यद इम्रान सैय्यद कुरबान (वय-47,रा.औरंगाबाद), आबेद खान ऊर्फ गुड्डूु नासेर खान (वय-34,रा. औरंगाबाद) दोघेही पुणे येथे वेगळ्याच चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असुन त्यांना ताब्यात घेण्यासाठी औद्योगीक वसाहत पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.