दहा लाखांसाठी किनगावच्या विवाहितेचा छळ : पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा

जळगाव : शहरातील रामनगर येथील माहेर असलेल्या विवाहितेला घर घेण्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये न आणल्याने छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह पाच जणांविरोधात एमआयडीसी पोलिसस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

किनगावच्या आरोपींविरोधात गुन्हा
मीना फिरोज तडवी (30) यांचे जळगाव शहरातील रामनगर येथे माहेर असून त्यांचा विवाह 2017 मध्ये फिरोज सरदार तडवी (रा.किनगाव ता., यावल) यांच्याशी रीतीरीवाजानुसार झाला. विवाहिता किनगाव येथे सासरी नांदत असताना तिचा पती फिरोज तडवी याने मुंबई येथे घर घेण्यासाठी आणि टीईटी परीक्षा पास होण्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये आणावे, अशी मागणी केली परंतु ही मागणी विवाहितेच्या नातेवाईकांनी पूर्ण न केल्यामुळे पती फिरोज तडवी याने विवाहितेला शिविगाळ करून मारहाण केली तर सासू, सासरे, दीर यांनी दमदाटी करून गांजपाठ केला. या छळाला कंटाळून विवाहिता ह्या जळगाव येथील माहेरी निघून आल्या. मंगळवार, 28 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती फिरोज सरदार तडवी, सासू मुमताज सरदार तडवी, सासरे सरदार गुलजार तडवी, दीर शाहरुख सरदार तडवी आणि मुक्तार सरदार तडवी (सर्व रा.किनगाव, ता.यावल) यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल नितीन पाटील करीत आहे.