जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव – चोपडा शहरातील धनगर गल्लीत असलेल्या प्लॉटवर लाखो रूपयाचे कर्ज असतांना सातबारा उताऱ्यावर खाडाखोड करून सदरील प्लॉट दुसऱ्याला विकल्याप्रकार दहावर्षापुर्वी घडला होता. या प्रकरणी गुरनं 51/2009 प्रमाणे चोपडा शहर पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. यातील आरोपी फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पकडण्यात यश आले आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी इम्तीयाज अली अकील अली जहागीरदार मुळ रा. धनगर गल्ली, चोपडा याचे नावे असलेला प्लॉट केजीएन कॉलनीतील प्लॉट नंबर 02 यावर चोपडा अर्बन को-बँक चे सात लाखांचे कर्ज काढले होते. त्यानंतर याच प्लॉटच्या सातबारा उताऱ्यावर खाडाखोड करून आरोपीने इम्तीयाज अली अकील अली जहागीरदार यांने फिर्यादीस 25 जून 2008 रोजी यांना विकला. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांच्या नुसार चोपडा शहर पोलीसात गुरनं 51/2009 भदवी कलम 420, 406 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून आरोपी हा फरार होता.
आरोपी इम्तीयाज अली अकील अली जहागीरदार हा अक्कलकुवा येथे असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल कुराडे यांना मिळाली. त्यानुसार श्री. कुराडे यांनी पोहेकॉ अनिल इंगळे, सुरेश महाजन, संतोष मायकल, इंद्रिस पठाण यांना अक्कलकुवा जि. नंदुरबार येथे रवाना केले. अक्कलकुवा येथे पोलीसांनी सापळा रचून आरोपी इम्तीयाज अली अकील अली जहागीरदार याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.