दहा विकेट्सनी हार पत्करणारा विराट पहिलाच खेळाडू; नकोसा विक्रम पदरात !

0

मुंबई: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान काल मंगळवारी पहिला एकदिवशीय सामना खेळला गेला. नववर्षात पहिल्याच सामन्यात यजमान भारताला मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजासमोर अपयशी ठरले. टीम इंडियाने विजयासाठी ठेवलेले 256 धावांचे माफक लक्ष्य ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता पार केले. डेव्हिड वॉर्नर आणि अ‍ॅरोन फिंच यांनी वैयक्तिक शतकी खेळी करताना टीम इंडियाच्या गोलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. नववर्षातील पहिल्याच आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यातील या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला. ऑस्ट्रेलियाकडून वन डे क्रिकेटमध्ये दहा विकेट्सनी हार पत्करणारा तो पहिलाच भारतीय ठरला. दहा विकेट्सनं वन डे क्रिकेटमध्ये पराभव पत्करणारा तो पाचवा भारतीय कर्णधार ठरला. यापूर्वी सुनील गावस्कर ( 1981), सचिन तेंडुलकर ( 1997), सौरव गांगुली ( 2000) आणि राहुल द्रविड ( 2005) यांच्या नावावर हा पराक्रम आहे.

नाणेफेकीचा कौल बाजूने लागताच ऑस्ट्रेलियानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विराटलाही प्रथम गोलंदाजीच हवी होती, परंतु नाणेफेक फिंचनं जिंकली. लोकेश राहुल व शिखर धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी करताना संघाचा डाव सावरला. धवन ( 74), राहुल ( 47) माघारी परतल्यानंतर टीम इंडियाचा डाव गडगडला.