भुसावळ – नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी दहा हजारांची लाच घेतांना सहाय्यक अभियंता राजेश लक्ष्मण भंगाळे (35, रा.थोरगव्हाण, ता.रावेर, मुळ रा.डी.एन.कॉलेजसमोर, फैजपूर) यास 27 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सावदा येथून रंगेहाथ अटक करण्यात आली. जळगाव एसीबीचे उपअधीक्षक जी.एम.ठाकुर यांनी ही कारवाई यशस्वी केली.