दहा हजार रुपये किंमतीची दुचाकी घरासमोरून लांबवली

Bike extended from Warangaon भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथून दहा हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवल्याप्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

घरासमोरून लावलेली दुचाकी लंपास
वरणगाव शहरातील सामना नगरात तक्रारदार राजू काशीनाथ चौधरी (38) यांनी दुचाकी (एम.एच.19 ए.के.2455) पार्क केल्यानंतर 8 रोजी रात्री 12.30 ते सकाळी सहा दरम्यान केव्हातरी चोरट्यांनी दुचाकी लांबवली. तपास हवालदार मुकेश जाधव करीत आहेत.