यावल- तालुक्यातील दहिगाव येथे एका 33 वर्षीय इसमाचा मृतदेह आढॠल्याने खळबळ उडाली आहे. मयत अक्षयतृतियेच्या सायंकाळपासुनउन्हात फिरून गावात जवळील शेतात गेला व बुधवारी सकाळी तेथे त्याचा मृतदेेह आढळल्याने उष्माघाताचा तर तो बळी नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गणेश ज्ञानदेव पाटील असे मयताचे नाव आहे. दहिगाव, ता.यावल गावालगत भिकन चिंतामण पाटील यांचे शेत आह.े या शेतात बुधवारी सकाळी शेती कामा करीता जाणार्या मजुरांना गणेश ज्ञानदेव पाटील (वय 33, रा. दहिगाव) यांचा मृतदेह दिसुन आला. अनेेकांनी शेताकडे धाव घेतली व पोलिसांना महिती दिली. या प्रकरणी किशोर पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ग्रामिण रूग्णालयात डॉ. सुरेश पाटील यांनी शवविच्छेदन करून दहिगावात शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंतसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परीवार आहे. तपास हवालदार महेबुब तडवी करीत आहे.