यावल : तालुक्यातील दहिगाव येथील मूळचा रहिवासी असलेल्या 27 वर्षीय तरुणाने पुण्यातील राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. शनिवार, 9 रोजी ही घटना घडली. पुष्कर नंदकुमार महाजन (27) असे मयत तरुणाचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
दहिगाव, ता.यावल येथील पुष्कर नंदकुमार महाजन (27) हा विवाहित तरूण गेल्या चार वर्षांपासून पुण्यातील एका कंपनीत नोकरीस होता व दोन वर्षीय मुलगी व पत्नीसह वास्तव्याला होता. पुष्करने शनिवार, 9 रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास पुण्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती तळेगाव पुणे पोलिसांना देण्यात आली तर टीनू नंदकुमार महाजन यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तरुणाने आत्महत्या का केली ? याची माहिती कळू शकली नाही. मयत तरुणाच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी व दोन वर्षाची मुलगी असा परीवार आहे.