दहिगावच्या विवाहितेचा छळ : पतीसह आठ आरोपींविरोधात गुन्हा

यावल : तालुक्यातील दहिगाव येथील विवाहितेचा माहेरून पैसे न आणल्याने पतीसह सासरच्यांनी शारीरीक मानसिक छळ केला तसेच मारहाणही केल्याने या प्रकरणी शुक्रवार, 25 फेब्रुवारी रोजी यावल पोलिसात विवाहितेने तक्रार दिल्यानंतर पतीसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल
यावल तालुक्यातील दहिगाव येथील माहेर असलेल्या कांचन भूषण जंजाळकर (26) यांचा विवाह रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील रहिवासी भूषण जगन्नाथ जंजाळकर यांच्याशी 2019 मध्ये रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाच्या एक महिन्यानंतर पती भूषण जंजाळकर याने काहीही कारण नसतांना पैश्यांची मागणी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर पैसे न दिल्याने विवाहितेला शिविगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यासोबत सासू, सासरे, नणंद, चुलत सासरे, चुलत सासू यांनीदेखील पैश्यांसाठी गांजपाठ केला. हा छळ व त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्यात.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
याबाबत विवाहिता कांचन जंजाळकर यांनी यावल शुक्रवार, 25 फेब्रुवारी रोजी धाव घेवून तक्रार दिल्याने पती भूषण जगन्नाथ जंजाळकर, सासू लिलाबाई जगन्नाथ जंजाळकर, सासरे जगन्नाथ डिगंबर जंजाळकर, ननंद संगीता निलेश जाधव, ननंद सुवर्णा प्रमोद रूल्हे, चुलत सासरे सदाशिव डिगंबर जंजाळकर, चुलतसासू मंगलाबाई सदाशीव जंजाळकर, सोपान सदाशिव जंजाळकर सर्व (रा.तांदलवाडी, ता.रावेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय देवरे करीत आहे.