यावल- तालुक्यातील दहिगाव जवळ सावखेडासिम रस्त्यावर भला मोठा अजगर एका कोल्ह्यास अर्धवट गिळलेल्या अवस्थेत दिसल्यानेे खळबळ उडाली हा प्रकार मंगळवारी सकाळी निदर्शनास आला तर कोल्ह्याची शिकार करतांना जखमी झालेल्या अजगरास कोल्हास फस्त करणे शक्य झाले नाही त्यात तो कासाविस झाला होता तर वनविभागानेे उपचारार्थ यावलला आणले असुन योग्य उपचार करून त्यास जंगलात सोडण्यात येईल असे सांगण्यात आले. तर अजगरास पाहण्याकरीता घटनास्थळी व यावल वनविभागा मोठी गर्दी झाली होती. मंगळवारी दहिगाव गावातुन सावखेेडासिम कडे जाणार्या रस्त्यावरील नाल्यात सकाळी 8 वाजेला शेतमजुरांना एका कोल्ह्यास गिळतांना अजगर निर्दशनास पडले त्यात कोल्ह्याची शिकार करतांना अजगरास डोक्या जवळ व अंगावर जखम झाली होती तर प्रमाणापेक्षा मोठा कोल्हा फस्त करणे अजगरास शक्य होत नव्हते तर कोल्ह्याचा तोंडाचा भाग आधी गिळल्याने कोल्हा गुदमरून मेला होता तर कोल्ह्यास पूर्णपणे गिळल्यावर अजगर देखील अस्वस्थ झाला होता.
वनविभागाच्या अधिकार्यांची धाव
हा प्रकार लागलीच दहिगावातील ए. टी. चौधरी यांनी प्रादेशिक वनविभागाच्या वनक्षेत्रपाल विशाल कुटे यांना कळवला तेव्हा कुटे यांनी उपवनसरक्षक प्रकाश मोराणकर यांनी या बाबत माहिती दिली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल कुटे हे वनरक्षक बाळासाहेब नलावडे, निंबा पाटील, विलास पाटील, असलम खान या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अर्धवट घशात फसलेल्या कोल्ह्यास काढत जखमी अजगराला सुरक्षीत यावलला वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. येथे पशुधन अधिकारी डॉ.इंगळे व दहिगावचे पशु वैद्यकिय अधिकारी डॉ. तांबे यांंनी उपचार केले. उपचारा अंती अजगर पुर्णपणेे बरा झाल्यावर त्यास वनात सोडण्यात येईल, अशी माहिती वनक्षेत्रपाल कुटे यांनी दिली आहे. घटनास्थळी व यावल वनविभागात अजगर पकडून आणल्याची माहिती मिळताच बघ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती
नागरीकांची सजकता
वन्यजीव अधिनियम नुसार अजगराची नोंद 1972 च्या अधिसुचित क्रमांक 1 वर आहे. त्यास ईजा पोहचवणे व शिकारीच्या उद्देशाने मारण्याकरीता सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहेे तेव्हा नागरीकांनी सजकता दाखली व कुणी काही गैरप्रकार केला नाही याचे वनक्षेत्रपाल यांनी कौतुक केले.