दहिगावात झोपडी पेटली : दुचाकीसह सायकलीचे नुकसान

यावल : तालुक्यातील दहिगाव येथे झोपडीला अचानक आग लागल्याने दुचाकीसह सायकल जळाली. शनिवार, 9 एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली असलीतरी या प्रकरणी रविवार, 10 एप्रिल रोजी दुपारी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

यावल पोलिसात आगीची नोंद
पंडित रामा श्रीखंडे (43, दहिगाव, ता.यावल) हे सलून व्यावसायीक असून त्याच्या घराबाजूला त्यांनी झोपडी बनवली तेेथे ते दुचाकी व सायकल ठेवतात. शनिवार, 9 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता ते जेवण करून कुटुंबीय झोपले असताना रात्री 11.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या झोपडीला अचानक आग लागल्याचे गल्लीतील एका तरुणाला समजले. त्याने आरडा-ओरड केली असता गल्लीतील नागरीकांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मिळेल त्या भांड्यात पाणी घेऊन ही आग विझवण्यात आली.

यावल पोलिसात अकस्मात आगीची नोंद
याप्रकरणी पंडित रामा श्रीखंडे यांनी रविवार, 10 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता यावल पोलिसात धाव घेऊन खबर दिल्याने अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. तपास हवालदार संजय देवरे करीत आहेत.