Suicide of fourth class student of Dahigaon Sant पाचोरा : तालुक्यातील दहिगाव संत रहिवासी व म्हसावदच्या इंग्लिश मेडीयम शाळेतील इयत्ता चौथीचा विद्यार्थी गौरव प्रवीण पाटील (11) याने शुक्रवार, 12 रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. विशेष आई-वडील घरी नसताना गौरवने हे पाऊल उचलले तर या प्रकारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घरातच केली आत्महत्या
प्रवीण नथ्थू पाटील हे पत्नीसह नाशिक येथे नातेवाईकांकडे ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी गेले असताना घरी गौरव व मोठा मुलगा कृष्णा होते. कृष्णा बाहेर गेल्यानंतर गौरवने दरवाजा आतून लावत गळफास घेतला तर काही वेळेनंतर कृष्णा आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. त्याने ही बाब काका रवींद्र पाटील यांना कळवल्यानंतर तातडीने गौरवला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. दहिगाव पोलिस पाटील विकास कोमलसिंग पाटील यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. डॉ.अमित साळूंके यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सचिन पवार हे करीत आहे.