नंदुरबार । तालुक्यातील दहिदुले गावात लोक सहभागातून बंधारा साकारण्यात आला असून यासाठी अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी श्रमदान केले. दहिदुले गावातील गावकर्यानी मिळून गावाजवळील ब्रिटिश कालीन बंधार्यांचे खोलीकरण व रुंदीकरण लोकसहभागातून पूर्ण केले आहे.
या बंधार्याचे पिचिंगचे काम श्रमदानातून करण्यात आले. गावकर्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कल्लशेट्टी तहसीलदार नितीन पाटील व त्यांचे सर्व कर्मचारी उपस्थित राहून श्रमदान केले. या बंधार्यामुळे गावाचा पाणी प्रश्न सोडण्यास मोठी मदत होणार आहे.