शिरपूर। तालुक्यातील दहिवद येथील अल्पवयीन विद्यार्थिनी 7 एप्रिल 2022 रोजी बारावीचे पेपर देण्यासाठी शिरपूर शहरात आली होती. ती विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याने तिचे अपहरण केल्याच्या संशयावरून तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली. पेपर दिल्यानंतर ती घरी आली नसल्याने तिचा सर्वत्र शोध घेतला. त्यानंतरही ती मिळुन आली नसल्याने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कायदेशीर रखवालीतून संमतीशिवाय फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोहेकॉ जी.एम.सोनवणे करीत आहे.