दहिवद येथील घरफोडीत 1 लाखाचा ऐवज लंपास

0

चाळीसगाव: घरातील लोक गच्ची वर झोपल्याचा फायदा घेऊन सेवा निवृत्त शिक्षकाच्या घराचा कडी कोयंडा तोडून आतील लोखंडी कपटाचा दरवाजा वाकवून त्यातील 60 हजार रोख व 40 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना तालुक्यातील दहिवद येथे 29 मे 2017 रोजी रात्री 10 ते 30 रोजी सकाळी 6 वाजेदरम्यान घडली असून अज्ञात चोरट्यांविरोधात मेहुणबारे पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गच्चीवरून खाली आल्यानंतर चोरी उघडकीस
तालुक्यातील दहिवद येथील सेवा निवृत्त शिक्षक युवराज नथू पाटील हे 29 मे 2017 रोजी कुटुंबासह रात्री 10 वाजेनंतर त्यांच्या घराच्या गच्चीवर झोपलेले असतांना अज्ञात चोरटयांनी दि 30 मे 2017 रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपटाचा दरवाजा वाकवून ड्राव्हर व लॉकर मध्ये ठेवलेले 60 हजार रुपये रोख व 25 हजार रुपये किमीची 5 तोळ्याची सोन्याची पोट, 750 रुपये किमतीची 15 ग्रॅम सोन्याची चैन, 4 हजार रुपये किमतीचे 8 ग्रॅमचे सोनीचे टोंगल, 2500 रुपये किमतीचे 5 ग्रॅमचे कानातील काप व 1500 रुपये किमतीचे 3 ग्रॅम सोन्याचे टॉप्स असा एकूण 1 लाख 5 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. सेवा निवृत्त शिक्षक युवराज पाटील हे सकाळी 6 वाजता गच्चीवरून खाली उतरल्यानंतर त्याच्या घरात चोरी झाल्याचे त्याना कळल्यानंतर त्यांनी मेहुणबारे पोलीस स्टेशन ला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाला मेहुणबारा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक डी.के. शिरसाठ यांनी भेट देवून तपास करीत आहे.