शिरपूर । तालुक्यातील दहिवद येथील 22 वर्षीय युवक हा त्याच्या मित्राचे पेपर असल्याने त्याच्यासोबत शिरपूर येथे गेला होता. त्यानंतर तो घरी परतलेला नाही. त्यामुळे याप्रकरणी युवक बेपत्ता झाल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अमोल राजेंद्र पारधी (वय 22, रा.दहिवद, ता.शिरपूर, जि.धुळे) असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. अमोल पारधी हा 7 एप्रिल 2022 रोजी दुपारच्या सुमारास दहिवद येथुन बालु उर्फ सुदर्शन नारायण गवळी याचे शिरपूर शहरातील एसपीडीएम महाविद्यालयात पेपर होते. त्यामुळे अमोल त्याच्यासोबत शिरपूर येथे गेला होता. तो परत घरी आला नाही. त्यामुळे त्याचा मित्रमंडळी, नातेवाईकांकडे आजुबाजुस शोध घेतला. त्यानंतरही तो मिळुन आला नसल्याची तक्रार राजेंद्र रामदास चव्हाण यांनी तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तपास पोहेकॉ जी.एम.सोनवणे करीत आहेत.