बंगळुरू येथील हॉटेलमधील घटना
शिरपूर- तालुक्यातील दहिवद येथील स्मिता पाटील पब्लिक स्कूलचे माजी प्राचार्य व विद्यमान सचिव, दोंडाईचा एज्युकेशन सोसायटीचे (रोटरी स्कूल) संस्थापक प्राचार्य व्ही. के. पाटील यांचे बंगळुरू येथे एका हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला. व्ही. के. पाटील बंगळुरू येथे त्यांच्या सीबीएससी स्कूलमध्ये असणार्या एका कर्मचार्याच्या लग्नासाठी गेले होते. त्यांच्या सोबत इतरही काही जण जाणार होते. मात्र ते काही कारणास्तव जाऊ न शकले नाही. त्यामुळे व्ही. के. पाटील एकटेच गेले होते. बंगळुरू येथील एका हॉटेलमध्ये व्ही. के. पाटील मुक्कामी होते. सोमवारी सायंकाळनंतर त्यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर फिरत होती.