दहिवद स्कूलमध्ये गणवेश व स्कूलबॅग वाटप

0

आरोग्यदूत डॉ. प्रमोद सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
चाळीसगाव – तालुक्यातील दहिवद येथील भीमराव खलाणे यांच्या हरिओम इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये आरोग्यदुत डॉ प्रमोद सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गणवेश व स्कुलबॅगचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून स्विट्स वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी मिलेनियम संस्थापक अध्यक्ष प्रितेशभाई कटारिया, माजी अध्यक्ष डॉ.शैलेंद्रसिंग पवार, माजी सेक्रेटरी प्रमोद गुलेचा व मिञपरिवार उपस्थित होते. लोकसेवक स्व.डि डि चव्हाण मूकबधिर शाळेत चेअरमन महेश चव्हाण आदींची उपस्थिती होती. आरोग्य तपासणी डॉ. क्रांती पाटील व डॉ. संतोष सांगळे यांनी केली. याप्रसंगी रोटरी मिलेनियम अध्यक्ष डॉ.प्रमोद सोनवणे यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरी मिलेनियम संस्थापक अध्यक्ष प्रितेशभाई कटारिया, माजी अध्यक्ष डॉ. शैलेंद्रसिंग पवार, माजी सेक्रेटरी प्रमोद गुलेचा आदी उपस्थित होते.

शुभेच्ठा भविष्यासाठी प्रेरणादायी
हा दिवस माझ्यासाठी उत्साहवर्धक राहिला व भविष्यासाठी प्रेरणादायी ठरला. अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या तर काहींनी फेसबुकवर, व्हॉट्सअपने तर काहींनी भ्रमनध्वनीने शुभेच्छा दिल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले. त्यात माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी आमदार राजीव देशमुख, शिवसेना नेते पप्पु गुंजाळ, माजी आमदार साहेबरााव घोडे, भोजराज पुंशी, भीमराव खलाणे, शिवसेनेचे उपगटनेत सुरेश स्वार, भगावान राजपूत, रामचंद्र जाधव, सुरेश चौधरी, पाणीपुरवठा सभापती दीपक पाटील, शिक्षण सभापती सूर्यकांत ठाकूर, महिला व बाल कल्याण सभापती रंजनाताई सोनवणे, भाजपाचे गटनेते राजू चौधरी, माजी जि प सदस्य शेषराव पाटील, बांधकाम सभापती चंदू तायडे, आरोग्य सभापती सोमसिंग राजपुत, नगरसेवक अरूण अहिरे, महेश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, भूषण पाटील, सीताराम ओंकार चव्हाण, रवि पाटील, राजू कोतकर, बापुराव पवार, रविंद्र चौधरी, सुरेश चौधरी, बाळासाहेब चौधरी, सदानंद चौधरी, जलसाक्षर अभियानाचे स्वप्निल कोतकर, राजुभाऊ राठोड, प्रा सुनिल निकम, विवेक चौधरी, अरूणदादा, राजूभाऊ पगार, कपिल पाटील, डॉ. संदिप निकम, धनंजयआप्पा मांडोळे, किशोर रणधीर, केमिस्ट असोसिएशनचे संदिप बेदमुथा, रोशनभाऊ जाधव, मंगल पहैलवान, महाराष्ट्र साहित्य परिषद विश्‍वस्त प्राचार्य तानसेन जगताप, प्रा.विजय पाटील, आण्णा कोळी, किसनराव जोर्वेकर, शिक्षक नेते राजेश पवार, आरबी जगताप, शालीग्राम निकम, मधुकर कासार, साहित्यिक मनोहर आंधळे, प्रा.साधना निकम, प्रा.श्यामकांत निकम, रमेश पोद्दार, राजेंद्र कटारिया, संभाजी सेनेचे लक्ष्मण शिरसाठ, रयत सेनेचे गणेश पवार, सुर्यकांत कदम, जनशक्तीचे उपसंपादक अर्जुन परदेशी, शुभम डेअरीचे जितेंद्र वाबळे, नम्रता डेअरीचे अशोक कोठावदे ग.स.संचालक विश्‍वासराव सुर्यवंशी, डॉ.गजेंद्र अहिरराव, रोटरीचे प्रदिप भांडारकर, नितीन पाटील, कांतीभाई पटेल, हिम्मतभाई पटेल व टिम, मिलेनियम संस्थापक अध्यक्ष प्रितेश कटारिया, प्रमोदभाऊ गुलेचा, सेक्रेटरी केतनभाई बुंदेलखंडी व टिम आणि डॉ.अभिजीत पाटील, राहुलजी वाकलकर मिञपरिवार, साई मोबाईलचे सुरेश मंधानी आदींनी शुभेच्छा दिल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.