दहिगाव:- भर बाजार पेठेतील मोबाईल दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी विविध कंपन्यांचे सुमारे 20 मोबाईल हॅण्डसेट आणि रिचार्ज व्हॉऊचर्स लंपास केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी आणखी एका दुकानाबाबत घडला होता. मात्र त्यावेळी चोरट्यांचा प्रयत्न फसला होता. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, चोरट्याची छबी सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांपुढे आरोपीला शोधण्याचे आव्हान आहे. दहिवेल गावातील पिंपळनेर रोडवरील साई समर्थ इलेक्ट्रॅानिक्स व रेफ्रीजरेटर नावाचे दुकान काल रात्री अज्ञात चोरट्यांनी छताचे पत्रे उचकाऊन फोडत 19 ते 20 मोबाईल हॅण्डसेट आणि अंदाजे दहा हजार रुपये किंमतीचे विविध कंपन्यांचे मोबाईल रिचार्ज व्हॉऊचर्स (कार्ड) लंपास केले.