दहिहंडीस सिनेअभिनेता प्रथमेश परबची उपस्थिती

0

धुळे । येथील जय बजरंग मित्र मंडळातर्फे उद्या 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता भव्य दहिहंडी उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला सुप्रसिध्द मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते प्रथमेश परब यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सालाबादा प्रमाणे जय बजरंग मित्र मंडळातर्फे चैनी रोड परिरातील किसनबत्तीवाला चौकात हा भव्य दहिहंडी उत्सव आयोजित करण्यात आला आहे.

चैनी रोड परिरातील किसनबत्तीवाला चौकात कार्यक्रम
कार्यक्रमाला आ.कुणाल पाटील,आ. अनिल गोटे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, डॉ.माधुरी बाफना,अनुप अग्रवाल,हिलाल माळी,भगवान करनकाळ, महापौर कल्पना महाले,संदीप महाले, विलास खोपडे,सुधाकर देशमुख,नगरसेविका मायादेवी परदेशी,बाजीराव पवार, महादेव परदेशी, गोविंददादा साखला यांच्यासह पोलीस अधिक्षक एम.रामकुमार, अपर पोलीस अधिक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव, गुन्हे अन्वेषण शाखेचे रमेशसिंग परदेशी, आझादनगर पोलीस स्टेशनचे दत्तात्रय पवार उपस्थित राहतील. या दहिहंडी उत्सव कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन जय बजरंग मित्र मंडळ, किसनबत्तीवाला चौक, चैनीरोड परिसर उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.