दहिहंडी कार्यक्रमात प्रथमेश परबने अहिराणीतून साधला संवाद

0

धुळे। गोकुळाष्टमीनिमित्त शहरात विविध ठिकाणी दहिहंडीचा उत्सव अत्यंत जोमात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील चैनीरोडवर असलेल्या जय बजरंग चौकातील दहिहंडी देखील यावेळी अविस्मरणीय अशी झाली. मंडळाचे पदाधिकारी निलेश काटे, विक्की परदेशी, मोहन टकले, राकेश वाघ यांचे नियोजन आणि टाईमपास फेम अभिनेता प्रथमेश परब याची उपस्थिती हे या दहिहंडीचे आकर्षण राहिले. प्रथमेश परब याने अहिराणीतून उपस्थितांशी संवाद साधल्याने ही दहिहंडी केवळ धुळेकरांनाच नव्हे तर तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच कायम लक्षात रहाणार आहे. या कार्यक्रमाला महापौर कल्पना महाले, नगरसेविका मायादेवी परदेशी, महादेव परदेशी, शिवसेनेचे हिलाल माळी, माजी सभापती विलास खोपडे, काँगे्रसचे साबीर शेख, सुप्रसिध्द डॉ.सौ.माधुरी बाफना, प्रभा परदेशी, नगरसेवक शरद वराडे, संजय गुजराथी आदींनी हजेरी लावली होती.

डीजेच्या तालावर मनोरे
पाण्याचे फवारे त्या खाली दहिहंडी फोडण्यासाठी मनोरे रचणारे गोविंदाचे पथक आणि त्याचवेळी डि.जे.वर सिनेगितांचे प्रसारण यामुळे एकुणच कार्यक्रमाला मोठी रंगत आली होती. मनोरे रचून दहिहंडी फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या गोविंदाचा प्रयत्न अयशस्वी होताच उपस्थितांमधून होणारा जल्लोष तसेच मनोरे जसजसे वर चढतील तसतसे गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थितांमधून देण्यात येणारा प्रतिसाद यामुळे वातावरण अल्हाददायी बनले होते. या दहिहंडीच्या यशस्वीतेसाठी जय बजरंग मित्र मंडळाचे अध्यक्ष विक्की परदेशी, निलेश काटे, मोहन टकले, संतोष परदेशी, राकेश वाघ, आकाश शिंदे, सिध्दार्थ खैरनार, गणेश वाघारे, गणेश जैन, रोहित चौधरी, हर्षल वाघ, हर्षल पाटील, स्वप्निल चौधरी, मनोज मोरे, हेमंत वाघ आदींनी परिश्रम घेतले.