दहीगाव बंधार्‍याजवळ बिबट्या मृतावस्थेत

0

एरंडोल । दहीगाव बंधार्‍याजवळ असलेल्या सोळा गाव पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनी जवळ निंबाच्या झाडाखाली तीन ते साडे तीन वर्ष वयाच्या बिबट्याची मादी मृतावस्थेत आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सदरची मादी भक्ष्य शोधण्यासाठी आल्यानंतर झाडावरून पडून झाडाचे अणकुचीदार खुंटी पोटाला लागून अतिरक्तस्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.सदरची मादीचा दोन ते तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचे वनाधिका-यांनी सांगितले.मयत मादीची दुर्गंधी सर्वत्र पसरली होती.

7 मे रोजी होणार काल्याचे किर्तन
दहीगाव बंधारा परिसरातील सोळा गाव पाणी पुरवठा योजनेच्या जवळ असलेल्या निंबाच्या झाडाजवळ बिबट्या मृत अवस्थेत पडलेला आहे अशी माहिती दूरध्वनीवरून दिली. माहिती मिळताच वनक्षेत्रपाल बी.एस.पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी घटना स्थळी भेट दिली. सहाय्यक वनसंरक्षक डी.आर.पाटील यांना देखील घटनेची माहिती दिल्यानंतर ते देखील घटनास्थळी दाखल झाले. मयत बिबट्याची मादी हि भक्शाचा पाठलाग करतांना झाडावर चढली असावी व पाय घसरून तोल गेल्यामुळे झाडावरून खाली पडून तिच्या मानेत अणकुचीदार खुंटी गेल्यामुळे तसेच खाली पडतांना तोंडाला मार लागल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.