दहीवेल-डांबरीपाडा येथे वाचमनचा खून

0

धुळे । नंदुरबार रस्त्यावरील दहीवेल -डांबरीपाडा येथे वाचमनचा खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदूरबारकडे जाणार्‍या रोडवारील दहीवेल डांबरी पाडा येथील वाचमन भिवा देसाई याचा रात्री अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून खून केल्याचे समोर आले आहे. खून केल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान घटना स्थळी पोलिसांचा चोक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस पंचनामा होऊन शवविच्छेदनासाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.