Youth from Nagardevla dies due to electric shock while playing garba पाचोरा : विजेच्या खांबास स्पर्श झाल्यानंतर नगरदेवळा गावातील तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री 11.15 वाजण्याच्या सुमारास नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा सुरू असतााना घडली. समाधान ज्ञानेश्वर महाजन (21) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
जागीच झाला मृत्यू
सेंट्रल बँक चौकाजवळील दुर्गोत्सव मंडळात समाधान हा गुरुवारी रात्री दांडीया खेळत होता. अचानक पाऊस सुरू झाला आणि रस्त्याच्या बाजूस असलेल्या विजेच्या खांबास या तरुणाचा स्पर्श झाला आणि काही कळण्याच्या आत समाधान खाली कोसळला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला तातडीने भडगाव रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास मृत घोषित केले. तरुणाच्या पश्चात आई व लहान भाऊ असा परीवार आहे.