दाखल्यांवर आता डीजीटल स्वाक्षरी

0

जळगाव । नागरीक व जिल्हा प्रशासन यांच्यातील कामांचे नियोजन पारदर्शकता व लवकर होण्यासाठी शासनाने ई-डिसनिक (इ-डिस्ट्रीक्ट इंन्फोरमेशन सिस्टम ऑफ एनआयसी) च्या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यामातून होणार आहे. या प्रणालीचा वापर 31 जूलैपासून राज्यभरात 100 टक्के वापर करण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनात आढावा बैठक घेण्यात आली. या प्रणालीत कोर्टच्या सुनावण्या, सुनावणीची तारीख, दाखल केसेस, निर्गत केसेस, पक्षाकार यासह व्हिजीटर्स यासह आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सदरील प्रणाली जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाद्वारे तयार करण्यात आले.

आता दाखला काढा घरबसल्या
आपले सरकार व महाऑनलाईन या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून प्रत्येक नागरीकाला घरबसल्या विद्यार्थ्यांसाठी लागणारे उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमेलेयर, जातीचा दाखला यांसह विविध प्रकारचे दाखले मिळण्याची सुविधा शासनाने करून दिली आहे. या ऑनलाईन पोर्टलमध्ये नागरीकांना स्वतः युजरआयडी व पासवर्ड तयार करून स्वत कागदपत्रे स्कॅन करून जोडावे लागणार आहे. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी या कागदपत्रांची पडताळणी करून डीजीटल स्वाक्षरीला पाठविला जाणार आहे. तसेच यात एका वेळी डिजीटल स्वाक्षरी करण्याचीही सुविधा शासनाच्या माध्यमातून करण्यात आले असून याचा फायदा नागरीकांसह विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यासाठी मदत होणार आहे.

डीजीटल स्वाक्षरीसाठी एचएसएम मशीनचा वापर
एचएसएम (हाय सेक्यूरीटी मॉड्यूल डीजीटल सिग्नीचर)च्या माध्यमातून नागरीकांकडून दाखल्याची मागणी ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून केल्यानंतर अव्वल कारकून यांच्या माध्यमातून स्कॅन केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर डीजीटल स्वाक्षरी करण्यासाठी टीक ऑप्शन दिलेले असून तहसिलदार किंवा प्रांताधिकारी हे एचएसएमच्या माध्यमातून एकचवेळी 250 ते 300 दाखल्यांवर डीजीटल स्वाक्षरी करण्यात येणार आहे.