Bhamta arrested for extorting lac jewelry from woman’s house in the name of subscription जामनेर : जामनेर शहरात देवीच्या नावाने वर्गणी मागण्याच्या बहाणा करून महिलेच्या घरातून 1 लाख 2 हजाराची सोन्याचे दागिने लांबविणार्या संशयित आरोपीला शहरातील तांबापूरा परीसरातून एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. सतबीर बलवितसिंग टाक (21, तांबापूरा, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जामनेर शहरातील चैतन्य नगरात सुलोचना रमेशचंद जैन ह्या 12 जुलै 2022 रोजी दुपारी 3 वाजता घरी एकट्या असतांना संशयित आरोपी सतबिर बलवितसिंग टाक (21, रा.तांबापूरा, जळगाव) हा देवीच्या वर्गणी मागण्याच्या बहाणा करून महिलेच्या घरात प्रवेश करत महिलेजवळील 1 लाख 2 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरी हिसकावून पसार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलीस नाईक गणेश शिरसाळे, विकास सातदीवे, योगेश बारी यांनी आरोपीला अटक करीत जामनेर पोलिसांच्या ताब्यात दिले.