दागिने लंपास

0

शिक्रापूर । वाघोली येथील वैशाली जोशी ही महिला औरंगाबाद येथून वाघोलीला येण्यासाठी जालना-पुणे या एसटीतून प्रवास करत होती. या महिलेशेजारी एका बाजूला एक महिला आणि दुसर्‍या बाजूला दुसरी महिला लहान मुलाला घेऊन बसल्या होत्या. जोशी यांनी दागिने आणि पैसे पिशवीमध्ये ठेवलेले होते. जोशी यांच्या शेजारी बसलेल्या महिला अचानक सणसवाडी येथे उतरल्या. यावेळी जोशी यांनी त्यांची पिशवी पाहिली असता त्या पिशवीची चैन उघडी दिसली. त्यामुळे त्यांनी पिशवीची चैन परत लावली आणि वाघोली येथे गेल्यावर एसटीतून उतरून घरी गेल्या. घरी गेल्यानंतर त्यांनी पिशवी तपासली असता त्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची माळ, तीन ग्रॅमचे मंगळसूत्र आणि 2 हजार रुपये रोख रक्कम चोरल्याचे समजले.

प्रवासात त्यांच्या शेजारी बसलेल्या दोन महिलांनी तिच्या दागिन्यांची चोरी केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. याबाबत जोशी यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिक्रापूर पोलिसांनी दोन अज्ञात महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.