दादर-खोपोली खुल्या सायकल शर्यतीसाठी प्रवेशिका पाठवा

0

मुंबई । मुंबई शहर हौशी सायकलिंग संघटनेतर्फे खुल्या दादर – खोपोली या 74 किलोमीटर अंतराच्या खुल्या सायकल शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही शर्यत 3 डिसेंबर रोजी रंगणार आहे. दादर येथील दादर पोलिस स्टेशनपासून या सुरुवात होणार्‍या या शर्यतीत खुला आणि माऊंटनरिंग बायकिंग (एमटीबी) असे दोन गट असतील. दादर पोलिस स्टेशन, वा.श.मटकर मार्ग (मशिद गल्ली), भवानी शंकर रोड- गोल मंदीर, विर कोतवाल उद्यान, टिळक पुल, खोदादाद सर्कल, आंबेडकर मार्ग, माहेश्‍वरी उद्यान, लोकमान्य टिळक रुग्णालय, सायन सर्कल, प्रियदर्शनी जंक्शन, अण्णाभाऊ साठे उड्डाणपुल, व्हि. एन. पुरव मार्ग, चेंबूर नाका, डायमंड गार्डन, मैत्रीपार्क, छत्रपती शिवाजी महाराज चौक, देवनार टेलिफोन फॅक्टरी, अणुशक्ती नगर जंक्शन, जुना खाडीपूल, सानपाडा, जुईनगर, कोकण भवन, खारघर, कळंबोली जंक्शन, पनवेल शहर उड्डाणपुल, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4, खोपोली, असा या शर्यतीचा मार्ग असणार आहे.

दादर ते देवनार टेलिफोन फॅक्टरी हा या शर्यतीचा न्यूट्रल झोन असेल. स्पर्धेतील विजेत्यांना सुमारे 90 हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येतील. शर्यतीत दोन प्राईम असणार आहेत. प्रत्येक प्राईममधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे. या शर्यतीच्या प्रवेशिका 26 नोव्हेबरपर्यंत स्वीकारल्या जातील असे मुंबई शहर हौशी सायकलिंग संघटनेचे अध्यक्ष अनिल तांबे यांनी सांगितले. या शर्यतीच्या अधिक माहिती आणि प्रवेशिकेसाठी अनिल तांबे (9821932387), चंद्रकांत वायकर (9867023687) सुभाष पोवळे (9923752402) किंवा सुधाकर तांबे (9869380923) यांच्याशी किंवा 167 , शॉप क्रमांक 1 इस्लामिया मस्जिद गल्ली, भवानी शंकर मार्ग , दादर, मुंबई 28, येथे संपर्क साधावा.