दादर ते साई नगर शिर्डी दरम्यान साप्ताहिक सुपर फास्ट विशेष गाडी धावणार

भुसावळ : मध्य रेल्वेने दादर ते साई नगर शिर्डी -साप्ताहिक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

दादरहून शिर्डीसाठी साप्ताहिक एक्स्प्रेस
डाऊन 02147 साप्ताहिक विशेष गाडी दादर येथून 5 मार्चपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर शुक्रवारी 9.45 वाजता सुटेल आणि साई नगर शिर्डी येथे दुसर्‍या दिवशी 3.45 वाजता पोहोचेल. डाऊन दिशेला नाशिक रोड, मनमाड, कोपरगाव स्थानकावर थांबा देण्यात आला. अप 02148 साप्ताहिक विशेष साई नगर शिर्डी विशेष गाडी 6 मार्चपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर शनिवारी सकाळी 7.25 वाजता सुटेल आणि दादर येथे त्याच दिवशी 1.25 वाजता पोहोचेल. अप दिशेला कोपरगाव, मनमाड, नाशिक रोड स्थानकावर थांबा देण्यात आला. या गाडीला एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, सात शयनयान, पाच द्वितीय श्रेणी आसन बोगी जोडण्यात येणार आहे. पूर्णपणे राखीव असलेल्या 02147/02148 विशेष गाड्यांचे बुकिंग सामान्य भाडे दराने 3 मार्चपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व ुुु.ळीलींल.ले.ळप या संकेतस्थळावर उघडेल. उपरोक्त विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या सविस्तर वेळेसाठी कृपया ुुु.शर्पिींळीू.ळपवळरपीरळश्र.र्सेीं.ळप ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.  केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.