दादावाडीतील चोरट्यांनी बंद घर फोडले

0

जळगाव – शहरातील दादावाडी येथे बंद घर चोरट्यांनी फोडून 53 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना 23 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याबाबत तालुका पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, यशोधर यशवंद कोठावदे (वय-38) रा. दादावाडी जळगाव यांच्या बंद घरात 20 सप्टेंबर 2018 सकाळी 7.30 ते 23 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून घरातील गोदरेज कपाटात ठेवलेले 38 हजार रूपये रोख आणि 15 हजार रूपये किंमतीचे सोने चांदीच्या वस्तू असे एकुण 53 हजार रूपये किंमतीची मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत तालुका पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे.कॉ. मगन मराठे करीत आहे.