दोंडाईचा । येथील माजी आमदार प्रसिध्द उद्योगपती सहकार महर्षी दादासाहेब रावल यांच्या जयंती निमित्त स्वामी विवेकानंद स्कुलच्यावतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये स्कूलच्या विद्यार्थानीं सहभागी घेवुन विविध कलागुण सादर केले. यात प्रायमरी सेक्शनच्या विद्यार्थांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्यांचा सजीव देखावे सादर केले. पहिली व दुसरीच्या विद्यार्थांनी चित्रकला स्पर्धत भाग घेत सुंदर चित्रे रंगविली. मोठ्या गटाने हाताने सुंदर गुलदस्ते तयार केले. काही विद्यार्थांनी स्वतः मिठाई, केक व सलाड तयार केले. तर नऊवी व दहावीच्या विद्यार्थांचे बुध्दीबळ स्पर्धा घेण्यात आली. यात दोन गटातील उपात्य फेरीतील विजेत्यांना संस्थेच्या सचिव शिप्रा रावल यांच्या हस्ते मेडल, प्रमाणपत्र व बक्षिस देवुन गौरविण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणुन सचिव शिप्रा ताई रावल, प्राचार्या संगीता राजपूत, अनिता जयसिंगाणी, ज्योत्सना वाणी आदी उपस्थित होते. यावेळी अनिता जयसिंगाणी यांनी मनोगत व्यक्त करतांना दादासाहेब रावल यांच्या जिवनपटावर आपल्या मनोगतातुन प्रकाश टाकला. तर शिप्रा रावल यांनी विद्यार्थांनी आपल्यातील कलागुण आत्मविश्वासाने सादर करावे. आपले चांगले गुण जगासमोर सादर करावे असे सांगितले. प्रास्तावीक प्राचार्या संगीता राजपूत यांनी केले. सुत्रसंचालन सचिन कुळकर्णी यांनी तर आभार जयश्री खारकर यांनी मानले.