चाळीसगाव/पाचोरा। मागील काही वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकरी सतत दुष्काळाचा सामना करत आहे नापिकी,गारपीट,अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिके सापडल्याने त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, सरकारची तुटपूंजी मदत त्यांना पुरणारी नाही म्हणून शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी तुरीला हमीभाव देऊन आहे ती तुर सरकारने खरेदी करावी अशी मागणी करण्यार्या शेतकर्यांच्या विरोधात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बेताल वक्तव्य करुन जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असून शेतकर्यांबद्दल अपशब्द वापरणार्या रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शेतकर्यांच्या भावना दुखावल्या प्रकरणी कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून चाळीसगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध करण्यात आला व चाळीसगाव येथे बंद असलेले तुर खरेदी केंद्र त्वरीत सुरु करावे या संदर्भात नायब तहसिलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्या विरोधात चाळीसगावात राष्ट्रवादी काँग्रेस तर पाचोर्यात शिवसेनातर्फे निषेध करण्यात आले. चाळीसगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. पाचोरा येथे शिवसैनिकांनी दानवे यांच्या पुतळ्याचे दहन केले.
चाळीसगावात निवेदन देताना यांची होती उपस्थिती
याप्रसंगी पक्षाचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, जि.प.सदस्य अतुलदादा देशमुख, भूषण पाटील, गव्हर्मेंट काँण्ट्रॅक्टर प्रशांत देशमुख, बाजार समितीचे माजी उपसभापती जालम पाटील, जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, पंचायत समिती सदस्य अजय पाटील, नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष भगवान पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, सुर्यकांत ठाकूर, दिपक पाटील, डि.ओ.पाटील, पिंप्री ग्रा.पं.उपसरपंच राजेंद्र मोरे, रतन साळुंखे, अॅड.प्रदीप अहिरराव, छगन पाटील, अॅड.शिवाजी बाविस्कर, युवक शहराध्यक्ष अमोल चौधरी, युवक जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, तालुका उपाध्यक्ष विनोद राठोड, प्रकाश पाटील, युवक शहर उपाध्यक्ष निरज अजबे, हर्षल ब्राह्मणकार, सुयोग शुक्ल, विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष यज्ञेश बाविस्कर, शहराध्यक्ष शिवसागर पाटील, तालुका उपाध्यक्ष सर्वेश भोसले, अभिलाष एसके, भाऊसाहेब सोनवणे, अजय पाटील, ऋषिकेश देशमुख, प्रज्वल देशमुख, कैफ शेख, हृदय देशमुख, निखिल देशमुख, मयुर सानप, गुंजन मोटे, पिनु सोनवणे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
पाचोरा येथे शहरप्रमुखांचे तहसीलदारांचे निवेदन
पाचोरा शिवसेना शहर प्रमुख किशोर बारवकर यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रात सतत गेल्या चार वर्षांपासून शेतकर्यांना संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत भाजप प्रदेशाध्यक्षांनी शेतकर्यांबद्दल असे बेताल वक्तव्य चुकीचे आहे. त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा शिरली असून त्यांनी बळीराजाचा अपमान केला आहे. अशा बेजबाबदार वक्तव्य करणार्या भाजपच्या नेत्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेना शहर प्रमुख किशोर बारवकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्या आहेत.