दानवेजी, ही तर जुलमी असंवेदनशील सरकारची अंतिम यात्रा: धनंजय मुंडे

0

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला प्रेत यात्रा म्हणणा-या भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा धनंजय मुंडे यांनी समाचार घेताना, ” दानवेजी तुम्ही बरोबर बोललात, भाजपा सेनेच्या जुलमी असंवेदनशील शेतकरीविरोधी सरकारची ही अंतिम यात्रा आहे पण तुमची एक चूक दुरुस्त करतो. या हुकूमशाही सरकारला शेवटचा नमस्कार करण्यासाठी लोक राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला तुफान गर्दी करत आहेत अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी पलटवार केला.

रावसाहेब दानवे यांच्या टीकेला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी ट्विट करतानाच त्यांच्याच जालना मतदारसंघातील महाजन आदेश यात्रेतील गर्दीचा पर्दाफाश करणारे 2 व्हीडिओ ही आपल्या ट्विटवर पोस्ट केले आहेत. भाजपचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे भाषण सुरू असताना मंडपातील रिकाम्या खुर्च्या या व्हीडिओ मध्ये दिसत असून केंद्रीय मंत्री झाले तरी काहींची ‘चकवा’ देण्याची सवय काही जात नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवस्वराज्य यात्रेच्या गर्दीचे फोटो पाठवले होते. आता रावसाहेब दानवे यांना त्यांच्याच मतदारसंघातील महाजनादेश यात्रेचा व्हिडीओ पाठवतोय. स्मशान शांतता म्हणजे काय तर ही… बघा दानवे साहेब! असे ट्विट मध्ये म्हटले आहे.