दापोडीत घरात घुसून अट्टल गुन्हेगाराची हत्या !

0

पिंपरी-चिंचवड-दापोडी येथे पूर्ववैनस्यातून १९ वर्षीय सराईत गुन्हेगाराची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अॅल्विन रवी राजगोपाळ (रा.जयभीम नगर, दापोडी) असे मयत गुन्हेगाराचे नाव आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक घरात घुसून अॅल्विनवर हल्ला करण्यात आला.

याप्रकरणी चार आरोपींना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर एकाचा शोध सुरू आहे. याप्रकरणी क्लेरा राबर्ट कीटटो यांनी फिर्याद दिली आहे. अभिषेक राजू चव्हाण, रुपेश दिलीप संकपाळ, राहुल वीर उर्फ पप्या, निखिल, सनी गजभिव (सर्व राहणार दापोडी) अशी हल्ला करणाऱ्या आरोपींची नावे असून यातील चार जणांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेत फिर्यादी क्लेरा राबर्ट कीटटो यांची आई पुष्पा राज गोपाळ या किरकोळ जखमी झाल्या आहेत. दरम्यान खून केल्यानंतर आरोपीने पळ काढला मात्र काही तासातच भोसरी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून अद्याप एक आरोपी फरार आहे.