महिला बचतगटांनी राबविला उपक्रम
नवी सांगवी : दापोडीतील बचत गटातील महिला सभासदांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या इफ्तार पार्टीमध्ये मुस्लीम भगिनीनी सहभाग घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका माई काटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष शेखर काटे, वार्ड अध्यक्ष जन्नतबी सय्यद आदींसह फातिमा महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या. याप्रसंगी वैशाली काळभोर व माई काटे यांनी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. दापोडीतील रोहितराज युवा प्रतिष्ठानच्यावतीने दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी येथील मुस्लिम अनाथ व विधवा महिलांना ईद साजरी करण्यासाठी कपडे व शिरर्खुमाचे साहित्य नगरसेवक रोहित काटे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी संतोष काटे, तानाजी काटे, रफिक शेख, बंटी मुजावर, अब्दुल शेख, अझर शेख, राकेश काटे आदी उपस्थित होते. समीर शेख सुत्रसंचलन केले. नजिद मुजावर यांनी आभार मानले.